Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar Politics News : श्रीगोंद्यात मोठा गोंधळ ! श्रीगोंदा विधानसभा जागेसाठी...

Ahmednagar Politics News : श्रीगोंद्यात मोठा गोंधळ ! श्रीगोंदा विधानसभा जागेसाठी इच्छुकांची मोठी संख्या

Ahmednagar Politics News : स्व. शिवाजीराव नागवडे हयात असताना त्यांनी सगळ्या नेत्यांना मदत केली. आम्हाला मात्र कोणी मदत करत नाही.

आता काहीही झाले तरी अनुराधा नागवडे यांना निवडणुकीत उतरवणारच कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा लढविणारच, असा निर्धार श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

श्रीगोंदा शहरातील छत्रपती महाविद्यालयामध्ये पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागवडे यांनी आपला निर्धार व्यक्त केला.नागवडे म्हणाले,

छत्रपती महाविद्यालयाची बापूंनी कशाप्रकारे उभारणी केली हे आपण पाहिले आहे. या उद्याच्या काळामध्ये या संस्थेचे नाव कसे मोठे होईल, यासाठी आम्ही अहोरात्र काम करत आहोत.

शाळेचे मैदान जिल्ह्यामध्ये एक नंबरचे आहे. अनेक नेते खाजगी कारखाना चालवत आहेत. मात्र आम्ही सहकारी कारखाना अत्यंत जोमाने चालवत आहोत.

शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कधीच आम्ही पैसे थकवले नाही. ज्यांना सहकार चालवता नाही आला. त्यांना खाजगी पण चालविता आला नाही. त्यांची अवस्था काय आहे, ते सर्वांना माहीत आहे.

सहकार टिकला तर शेतकरी टिकेल तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकारीलाच ऊस द्यावा. अन्यथा सर्वसामान्य शेतकरी उसाच्या शेतीपासून दूर जाईल. तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक होईल. येणाऱ्या काळाची परिस्थिती बिकट आहे.

शेतकऱ्यांना उसाला भाव जास्तीत जास्त कसा देता येईल, याबाबत विचार आम्ही सातत्याने करत आहोत. श्रीगोंदा येथे मिलिटरी भवन बांधण्यासाठी माझी स्वतः ची २ गुंठे जागा देण्याची माझी तयारी आहे. तसेच श्रीगोंदातील पत्रकार भवनासाठी पत्रकारांसाठी जागा उपलब्ध करून देणार आहे.

याबरोबरच शेतकऱ्यांचे, नागरिकांचे पाण्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, साखर कारखान्याचे तसेच तालुक्यातील न्यायालयाच्या इमारतीचे काम असेल किंवा जिल्हा न्यायालय प्रश्न, असे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कायम पुढाकार घेत आहे.

यावेळी प्रशांत दरेकर, सुरेश रसाळ, भाऊसाहेब नेटके, श्रीनिवास घाडगे, दत्तात्रय काकडे, शरद खोमणे, संदीप औटी, सुभाष शिंदे, बंडूतात्या जगताप, स्मितल वाबळे, राहल साळवे, रायकर नाना, धमनिद काकडे, वसंतराव बाळुंज, प्रा. सतीशचंद्र सूर्यवंशी, संचालक व पत्रकार उपस्थित होते.

श्रीगोंदा विधानसभा जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. तसेच राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना महाआघाडीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार यावरही मोठी रस्सीखेच सुरू आहे.

यापूर्वी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली आहे. असे असतानाच नागवडे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. यामुळे महाआघाडीत गोंधळ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments