अहमदनगर

आमदार निलेश लंके यांनी केला मोठा पर्दाफाश !

जिल्हा स्तरीय बिगर आदीवासी योजनेअंतर्गत वनविभागामार्फत पारनेर तालुक्यात राबविण्यात आलेल्या मृद व जलसंधारणाच्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी प्रत्यक्ष कामावर जाऊन कागदपत्रांसह उघड केला.

आ. लंके यांनी कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला आहे हे कागदपत्रांसह सिध्द करून दाखविल्यानंतर उपवनसंरक्षक स्वाती मानेही आवाक झाल्या. याप्रकरणी दोषी असलेले

सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे तसेच वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांच्याकडील पदभार तात्काळ काढून घेण्याचे त्यांनी मान्य केले. दरम्यान, या भ्रष्टाचाराप्रकरणी आपण विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे आ. लंके यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वनविभागातील भ्रष्टाचारासंदर्भात आ. नीलेश लंके यांनी गेल्या आठवडयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने या तक्रारीची गंभीर दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते.

डॉ. भोसले यांनी उपवनसंरक्षक स्वाती माने यांना आ. नीलेश लंके यांच्यासह प्रत्यक्ष कामावर जाऊन या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आ. नीलेश लंके यांच्यासह उपवनसंरक्षक स्वाती माने यांनी शनिवारी वाळवणे, रूईछत्रपती दरम्यानच्या कामांना भेटी देउन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी उपस्थित असलेले सहाय्यक उपवनसंरक्षक रमेश देवखिळे, वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांनी वेळकाढूपणाची उत्तरे देत सुरूवातीस दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाहणी करण्यात येत असताना सबंधित तक्रारीसंदर्भातील एकही दस्तऐवज देवखिळे तसेच प्रताप जगताप यांच्याकडे उपलब्ध नव्हता. कार्यालयाकडे मोबाईलवर ठराविक कागदपत्रे मागवा असे सांगण्यात आल्यानंतरही आज सुटी असल्यामुळे कार्यालय बंद असल्याचे उत्तरे ते देत होते.

ही कामे प्रत्यक्ष केलेल्या मजुरांच्या नावांची यादी वनक्षेत्रपाल जगताप यांनी आ. लंके यांना सादर केली. तेथेच आ. लंके यांनी भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला.

या यादीमधील मजुर प्रत्यक्षात कामावर उपस्थित होते का अशी विचारणा आ. लंके यांनी केल्यानंतर महिला कर्मचारी वनरक्षक केंद्रे यांनी होय असे उत्तर दिले. या कर्मचाऱ्यांची मजुरी आदा करण्यासाठी तयार करण्यात आलेला ‘लेखा रोखा’ पाहण्यासाठी आ. लंके यांंनी मागितला असता

तो देण्यास उपवनसंरक्षक माने, सहा. उपवनसंरक्षक देवखिळे, वनक्षेत्रपाल जगताप यांनी अमर्थता दर्शविली. ठराविक रोखे मोबाईलवर मागवा असे सांगण्यात आल्यानंतर मागवितो असे सांगूनही जगताप यांनी ते मागविलेच नाहीत.

अखेर आ. लंके यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले लेखा रोखे अधिकाऱ्यांपुढे सादर करताच सगळेच आवाक झाले. लेखा रोख्यांवर ज्यांना मजुरी आदा करण्यात आली आहे,

त्यांची नावेच नव्हती. प्रत्यक्ष मजुर व लेखा रोख्यांवरील मजुरांची पतडताळणीच होऊ शकली नाही. त्यावर उपवनसंरक्षक माने, सहा. उपवनसंरक्षक देवखिळे, वनक्षेत्रपाल जगताप निरूत्तर झाले. विशेष म्हणजे या कामांवर प्रत्यक्ष देखरेख करणारे वनपाल, वनरक्षक यांच्याही स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या, मात्र भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांना दूर ठेवण्यात आले.

यात दोषी असलेले देवखिळे तसेच जगताप यांचा पदभार तात्काळ काढून घेण्याच्या सुचना आ. लंके यांनी दिल्या. त्यास उपवनक्षेत्रपाल स्वाती माने यांनी मान्यता दिली. या भ्रष्टाचारासंदर्भात आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Back to top button