अहमदनगर

मोठी बातमी: नगरचे अवैध गर्भपाताच्या गोळ्या प्रकरण विधानसभेत; मंत्री म्हणाले,…

अहमदनगर- एमआयडीसी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पकडलेल्या अवैध गर्भपाताच्या गोळ्यांचे प्रकरण विधानसभेत गाजले आहे.

 

हरियाणा राज्यातून अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने शहरी भागात गर्भपाताच्या गोळ्यांचा बेकायदा पुरवठा होत असून एमआयडीसी पोलिस तसेच अन्न आणि औषध प्रशासनाने छापेमारी करून ९ हजार गोळ्यांचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात मान्य केली आहे.

 

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय मिशो अँपवरती ऑनलाईन पोर्टलवर गर्भपाताची औषधे मिळत असल्याचेही राठोड यांनी लेखी उत्तरात मान्य केले आहे. मेशो ऑनलाईन अँपवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्या प्रकरणी राज्यात १४ ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती राठोड यांनी उत्तरात दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button