BIG NEWS : राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा !

कोरोनाच्या काळात आलेले भरमसाठ बिल (electricity bill) अजूनही लोक फेडत आहे. अशातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नवीन घोषणा केली आहे.
राज्यात सध्या थकीत वीज हा एक महत्वाचा मुद्दा बनला आहे. हे थकीत वीज बिल भरण्यासाठी सरकारकडून नागरिकांना नेहमी आव्हान केलं जात. मात्र, यावेळी राज्यातील हा बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.
ज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. एक-रकमी थकबाकी भरल्यास सर्व वीज ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे.
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने नवी योजना जाहीर करण्यात आली. विलासराव देशमुख अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. सोबतच उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रकम माफ होणार आहे.
तसेच लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रकम माफ होणार. मात्र कृषिपंप ग्राहकांना दिलासा नाहीच. जागतिक पर्यटन केंद्र लोणार येथून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी घोषणा.