अहमदनगर

मोठी बातमी ! पेटीएम बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका; जाणून घ्या नेमके काय झाले?

भारतीय रिझर्व्ह बँकेनं Paytm ला मोठा झटका दिला आहे. तसंच आपल्या एका सेवेसाठी नवे ग्राहक जोडणं तात्काळ बंद करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले.

तसंच यामागे कोणतं कारण आहे हेदेखील रिझर्व्ह बँकेनं सांगितलंय. दरम्यान याबाबत देण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ होणार आहे.

भांडवली बाजारात आयपीओ आणल्यापासून पेटीएम कंपनीच्या अडचणी वाढतच आहे. आता रिझर्व्ह बँकेने दणका दिल्यामुळे पेटीएम बँकेच्या सेवेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाला आहे.

आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवीन ग्राहकांना तात्काळ जोडण्यास थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

पेटीएम पेमेंट बँकेचा आयटी लेखा परीक्षण अहवाल तपासल्यानंतर याबाबत निर्णय घेतला गेला आहे. बँकेला तिच्या IT प्रणालीचे सर्वसमावेशक सिस्टम ऑडिट करण्यासाठी आयटी ऑडिट फर्म नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे अधिकृत आदेशात म्हटले आहे.

ही कारवाई बँकेत आढळलेल्या काही सामग्रीच्या पर्यवेक्षकीय समस्यांवर आधारित आहे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास रिझर्व्ह बँकेने मनाई केली आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेची स्थापना ऑगस्ट २०१६ मध्ये करण्यात आली होती. तसंच यानं मे २०१७ औपचारिकरित्या आपलं कामकाज सुरू केलं होतं. डिसेंबर २०२१ मध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्युल बँकेचा दर्जा मिळाला होता.

शेड्युल बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँक सरकारी आणि अन्य मोठ्या कॉर्पोरेशनच्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजलमध्ये भाग घेऊ शकते, प्रायमरी ऑक्शनमध्येही सहभागी होण्याचीही संधी मिळेल.

याशिवाय त्यांना फिक्स्ड रेट, व्हेरिएबल रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीसाठीही भागीदार बनता येईल. यापूर्वी शुक्रवारी पेटीएमच्या शेअरमध्येही किंचित घसरण झाल्याचं दिसून आलं.

पेटीएमचा शेअर आता ७७४.८० रुपयांवर आला आहे. यापूर्वी पेटीएमच्या शेअर्समध्ये ४२ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण दिसून आली आहे. गेल्या महिनाभरात यामध्ये १० टक्क्यांची घसरण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button