अहमदनगर

मोठी बातमी : विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या नाही !

यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांना मुकावं लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, या शैक्षणिक वर्षात मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी

इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणार्‍या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

थोडक्यात मार्चमध्ये परीक्षा संपून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना उन्हळ्याच्या सुट्या मिळत होत्या. मात्र यंदा संपूर्ण मार्च आणि एप्रिल महिनाभर विद्यार्थ्यांची पूर्ण वेळ शाळा असणार आहे.

इतकंच नाहीतर रविवारीही ऐच्छिक असल्यास शाळा सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही असंच दिसतंय.

शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तिसर्‍या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत.

त्यामुळे भर उन्हात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. संपूर्ण एप्रिल महिना हा शाळा अभ्यास आणि परीक्षांमध्ये जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button