अहमदनगर

मोठी बातमी: जागेच्या वादातून तिघांनी एकाला पेटविले; ९० टक्के भाजल्याने…

अहमदनगर- जागेच्या वादावरून बशीर खान पठाण (रा. अमीर मळा, नगर) नामक व्यक्तीला तिघांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. आज (मंगळवार) नगर-औरंगाबाद रोडवरील अमीर मळा येथे रात्री ही घटना घडली. बशीर खान पठाण ९० टक्के भाजले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.

 

बशीर पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनीचा वाद सुरू असून या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

बशीर पठाण यांच्या मांडीवर आधी तलवारीने वार केले व त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये बशीर पठाण हे गंभीर भाजले आहेत.

 

 

पोलिसांनी रात्री उशिरा बशीर खान पठाण यांचा जबाब नोंदवून घेतला. तिघांनी मारहाण करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिलेल्या जबाबात म्हटले आहे. याबाबत भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान जागेच्या वादावरून थेट जिवंत जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button