अहमदनगर

मोठी बातमी: रेखा जरे हत्याकांडातील दोन आरोपींचा…

अहमदनगर- जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी आदित्य चोळके व सागर भिंगारदिवे यांचे जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच याप्रकरणातील गुन्हा दाखल असलेल्या बारापैकी दोन जण गैरहजर असल्याने त्यांना शेवटची संधी म्हणून त्यांचे गैरहजर राहण्याचे अर्ज मंजूर करण्यात आले.

 

मात्र, पुढच्या सुनावणीस हजर राहिले नाही व त्यांचे वकिलही हजर राहिले नाही तर त्या तारखेस आरोप निश्‍चितीची प्रक्रिया पूर्ण करून खटला सुनावणी सुरू करण्याची तंबी न्यायालयाने सर्वांना दिली.

 

रेखा जरे हत्याकांडातील चोळके व भिंगारदिवे यांनी जामिनावर सुटका करण्याची मागणी केली होती. त्याला सरकार पक्षातर्फे काम पाहणारे अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी आक्षेप घेतला होता व त्यांनी याबाबत लेखी म्हणणे मांडले होते. या प्रकरणात त्यांना सहाय करणारे अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी या म्हणण्यानुसार न्यायालयासमोर युक्तिवाद केला होता. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद 6 सप्टेंबरला ऐकल्यावर न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला व चोळके आणि भिंगारदिवे यांचे जामीन मागणी अर्ज नामंजूर केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button