ताज्या बातम्या

Car On Bigogas : आता पेट्रोल, डिझेल, CNG ला करा रामराम ! खूप स्वस्तात चालणार तुमची कार; जाणून घ्या कसं…

देशात इंधनाचे दर वाढले आहेत. अशा वेळी कार घेऊन प्रवास करणे अनेकांना महागात पडत असते. मात्र यावर आता एक नवीन उपाय आलेला आहे.

Advertisement

Car On Bigogas : देशात इंधनाचे दर पाहता सर्वसामान्यांना कार फिरवणे फार अवघड झाले आहे. कारण कारमुळे प्रवासादरम्यान अधिक पैसे मोजावे लागतात जेणेकरून कुटुंबाचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडून जाते.

मात्र आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. कारण आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर वीरेंद्र कुमार विजय यांनी एक असा प्लांट तयार केला आहे, ज्याचा फायदा लोकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

हा कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचा प्लांट आहे, म्हणजे घरातून बाहेर पडणाऱ्या भाज्या आणि फळांच्या साली याचा वापर करून हा गॅस बनवला जातो.

Advertisement

प्रोफेसर वीरेंद्र कुमार विजय यांच्या म्हणण्यानुसार आता तुमची कार चालवण्यासाठी तुम्हाला पेट्रोल, डिझेल भरण्याची गरज नाही कारण आता तुम्ही तुमची कार बायोगॅसवर चालवू शकता. यामुळे तुमचे खूप पैसे वाचणार आहेत.

तसेच चारचाकीसोबत दुचाकीला देखील हे किट तुम्ही वापरू शकता. कालांतराने शेती कामासाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर देखील बायोगॅसवर चालवला जाईल. असे ते म्हणाले आहेत.

Advertisement

त्याचसोबत आतापर्यंत तुम्ही पाहिले असेल की बायोगॅस फक्त घरातील स्वयंपाक बनवण्यासाठी वापरला जात होता. मात्र आता याचा उपयोग वाहनांसाठी होणार असल्याचे प्रोफेसर वीरेंद्र कुमार विजय यांनी यावेळी सांगितले आहे.

जर चार चाकी CNG कार बायोगॅसवरती चालवली तर ती एका वेळी 21 किलोमीटर पर्यंत धावू शकते. जर तुम्ही खेडेगावात राहत असाल तर तुमच्यासाठी बायोगॅस प्लांट खूप फायद्याचा ठरू शकतो. कारण तुम्ही घरातील स्वयंपाक, किंवा लाइटची समस्या यामार्फत सहज सोडवू शकता.

बायोगॅस कसा तयार होतो?

Advertisement

तुमच्या घरातील किचनमधून निघणारा कचरा ज्यामध्ये फळांच्या साली, खराब पालेभाज्या यांचा वापर करून बायोगॅस तयार केला जातो. प्रोफेसर वीरेंद्र कुमार विजय यांनी या प्लांटसाठी आयआयटी कॅम्पसमध्ये असणाऱ्या 200 पेक्षा अधिक घरातून कचरा गोळा करून या प्लांटसाठी त्याचा वापर केला हे.यामध्ये दररोज 10 किलो स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून 1 घनमीटर गॅस बनवता येतो.

दररोज 200 किलो कचऱ्यापासून 20 घनमीटर गॅस तयार होतो. म्हणजे इथे रोज 8 किलोचा CNG सिलेंडर भरता येतो. दररोज 10 कुटुंबांसाठी अन्न तयार केले जाऊ शकते. याशिवाय दररोज 30 युनिट वीजही निर्माण करता येते.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button