अहमदनगरताज्या बातम्या

भाजपने फसव्या योजना आणून लोकांची लूट केली ! गावाची एका वर्षात ६५ कोटींची फसवणूक

शिवसेना नेते साजन पाचपुते यांनी भाजपकडून जनतेची होत असलेली फसवणूक आकडेवारीसह मांडत 'होऊ द्या चर्चा' असे म्हणत थेट भाजपलाच आव्हान दिले.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नगर तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा’ अभियान सुरू आहे. मंगळवारी (दि.३) रूईछत्तीशी येथे शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे,

शिवसेना नेते साजन पाचपुते यांनी भाजपकडून जनतेची होत असलेली फसवणूक आकडेवारीसह मांडत ‘होऊ द्या चर्चा’ असे म्हणत थेट भाजपलाच आव्हान दिले.

जनतेची दिशाभूल करणारे काय विकास करणार? भाजपने वेळोवेळी लोकांची दिशाभूल केली आहे. येणाऱ्या आगामी सर्व निवडणुकांत भाजपला घरी बसवण्याचे काम जनता करणार आहे.

Advertisement

प्रत्येक शिवसैनिकांनी भाजपच्या या फसव्या विचाराचा घरोघरी जाऊन प्रचार आणि प्रसार करावा, असे आवाहन दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केले.

कार्यक्रमास युवा सेना दक्षिण जिल्हाप्रमुख सोमनाथ कांडके, दक्षिण उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, श्रीगोंदा तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे,

नगर तालुका युवा सेना प्रमुख प्रवीण गोरे, बिभीषण सपाटे, राजकुमार गोरे, माणिक गोरे, रंगनाथ गोरे, सोमनाथ गोरे, प्रभाकर बोरकर, संजय नवसुपे, आजिनाथ हजारे, शरद गोरे, आकाश गोरे, हृषिकेश गोरे उपस्थित होते.

Advertisement

पाचपुते म्हणाले, भाजपने उज्ज्वला गॅस, २०२२ पर्यंत प्रत्येकाला पक्की घरे, शेतीमालावर निर्यात शुल्क या बाबींवर फसवणूक केली आहे. या फसव्या भाजपला पाडण्यासाठी जनता मतदानाची वाट पाहत आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्याची आपली भूमिका असेल, असे ते म्हणाले

रुईछत्तीशीची ६५ कोटींची फसवणूक

गाडे म्हणाले, १२ गावांत मोदींच्या योजनांविषयी माहिती घेतली असता कोणालाच लाभ मिळाला नाही असा अभिप्राय जनतेने दिला आहे. भाजपने फसव्या योजना आणून लोकांची लूट केली आहे.

Advertisement

एकट्या रुईछत्तीशी गावाची एका वर्षात ६५ कोटींची फसवणूक मोदी सरकारने केली आहे. सोयाबीन ५ कोटी, कांदा १० कोटी, गॅस ३ कोटी, डिझेल ६ कोटी, पेट्रोल ५७ कोटी असे सुमारे ६५ कोटी रुपये सरकारने दिशाभूल करुन लोकांच्या खिशातून काढले आहेत, असे गणित गाडे यांनी मांडत भाजपच्या फसव्या योजनांची लोकांना माहिती दिली

Related Articles

Leave a Reply

Back to top button