सोशल मीडियातून भाजपच्या भूलथापा ! फसवेगिरीपासून तरुणांनी सावध राहा
त्यांच्या फसवेगिरीपासून तरुणांनी सावध राहावे, राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असावे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून, त्यांच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून भूलथापा देऊन युवकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
त्यांच्या फसवेगिरीपासून तरुणांनी सावध राहावे, राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असावे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथे मंगळवारी (दि. १०) नळ योजनेचे उद्घाटन व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सरपंच पुष्पा गुंजाळ, उपसरपंच बाबूराव गोंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास पानसरे यांसह विष्णू रहाटळ, काशिनाथ गोंदे, दशरथ वर्पे, संजय वामन, बाळासाहेब राहणे,
भाऊसाहेब नवले, तुषार गुंजाळ, मंगेश वर्पे, दादासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, अमोल वाकचौरे, सोपान वर्पे, वनिता साबळे, मंगल कुदळ,
पोपट कड्डू, श्रीपत कुदळ, मधुकर गोंदे, बबन घोडे, दत्तात्रय तारडे, मंगेश वर्पे, योगेश गुंजाळ, गोरख कुदळ, विलास गुंजाळ आदी उपस्थित होते.
गावाचे नाव राज्यात
कोळवाडे परिसरात विविध विकासकामांसाठी मोठा निधी मिळवून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. कोळवाडे गावातील आश्रमशाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी शासकीय अधिकारी बनले आहेत. त्यामुळे या गावचे नाव राज्याच्या कानाकोपयात पोहोचले. ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असेही आमदार थोरात म्हणाले.