Blood Pressure : नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतो? तो नियंत्रणात ठेवण्यासाठी काय- काय करावे? जाणून घ्या तुमच्या फायद्याची माहिती
रक्तदाब अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की तणावामुळे व्यक्तीचा बीपी वाढू शकतो. त्यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येशी झुंजत आहेत.

Blood Pressure : जगात सध्या सर्वात जास्त लोक हे रक्तदाबाच्या समस्येमुळे हैराण आहेत. अगदी तरुणांपासून ते मोठ्यांपर्यंत लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. मात्र, बीपी हे सायलेंट किलरसारखे असून लोकांचे लक्ष त्याकडे कमी आहे.
त्याच वेळी, काही लोक आहेत जे रक्तदाबाची समस्या हलक्यात घेतात. मात्र असे करणे तुमच्या जीवावर बेतू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तदाबाच्या संबंधी काही महत्वाची माहिती सांगत आहे.
रक्तदाब म्हणजे काय?
ब्लड प्रेशर म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून ज्याच्या मदतीने रक्त रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचते. जेव्हा हृदय पंप करते, तेव्हा ते ऑक्सिजन समृद्ध रक्त धमन्यांमधून बाहेर ढकलण्यासाठी शक्ती वापरते.
हे रक्त शरीरातील पेशी आणि ऊतकांपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत रक्तदाब खूप जास्त असल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तदाब जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वेळोवेळी ते मोजणे.
सामान्य रक्तदाब किती असावा?
निरोगी राहण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने योग्य आहार आणि व्यायामाचे पालन करणे आणि वेळोवेळी त्याचे बीपी तपासणे खूप महत्वाचे आहे. सामान्य रक्तदाब पातळी 120/80 mmHg पेक्षा कमी असते. रक्तदाबाची समस्या कोणत्याही वयात होऊ शकते, त्यामुळे तो नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज प्रतिबंधात्मक पावले उचलणे महत्त्वाचे आहे.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?
निरोगी वजन राखा: जर एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असेल किंवा लठ्ठ असेल तर, वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, यामुळे बीपी कमी होण्यास मदत होईल.
निरोगी पदार्थ खा: सामान्य रक्तदाब राखण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून, आहारात ताजी फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट करण्याची शिफारस केली जाते.
सोडियम कमी करा: सोडियमचे जास्त सेवन हे बीपी वाढण्याचे एक प्रमुख कारण असू शकते. म्हणून दररोज 1,500 मिलीग्राम सोडियम कमी वापरण्याची शिफारस केली जाते. मीठ दररोज 1,000 मिलीग्राम किंवा त्यापेक्षा कमी मर्यादित करण्याचा प्रयत्न करा.
सक्रिय रहा: दर आठवड्याला किमान 90 ते 150 मिनिटे व्यायाम करा. यामध्ये एरोबिक्स, योग, चालणे किंवा कोणत्याही शारीरिक हालचालींचा समावेश असू शकतो. जर तुम्ही या सर्व नियमांचे पालन केले तर नक्कीच ब्लड प्रेशरबाबत कोणतीही समस्या तुम्हाला निर्माण होणार नाही.