boAt Smart Ring : मस्तच ! आता ही बोटातील रिंग घेईल तुमच्या आरोग्याची काळजी, जाणून घ्या याचे गजब फायदे
कंपनी पहिली स्मार्ट रिंग लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जी आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी बोटावर घातली जाऊ शकते.

boAt Smart Ring : देशात आरोग्याच्या बाबतील लोक अधिक सतर्क होत आहेत. अशा वेळी बदलत्या काळासोबत, तंत्रज्ञानाच्या जगात बरेच बदल आणि प्रगती होत आहे.
अशा वेळी आरोग्याशी संबंधित गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी अनेकांना स्मार्टवॉच आवडतात. याद्वारे हृदय गती, बीपी, ताप यासह आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी ओळखता येतात.
तथापि, आता तुमच्यासाठी स्मार्टवॉच हे एक जुने गॅझेट असू शकते कारण तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच एक स्मार्ट रिंग बाजारात येणार आहे. ही boAt कंपनीकडून पहिली स्मार्ट रिंग लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
अशा परिस्थितीत, तुम्ही ही रिंग तुमच्या बोटात घालून आरोग्य ट्रॅक विषयी माहिती करून घेऊ शकता. दरम्यान तुम्हीही boAt स्मार्ट रिंगबद्दल जाणून घेऊ शकता.
boAt स्मार्ट रिंग डिझाइन
मिळालेल्या माहितीनुसार बोट स्मार्ट रिंगची रचना खूपच आकर्षक असेल. ते धातू आणि सिरॅमिकपासून बनवले जाईल. ही अंगठी खूप कॉम्पॅक्ट आणि हलकी असेल. तसेच ही अंगठी कोणत्याही आउटफिटसोबत जोडण्याची सुविधा असेल. याला 5ATM रेटिंग दिले जाईल, ज्यामुळे घड्याळ पाणी आणि घामाने खराब होणार नाही.
boAt स्मार्ट रिंग स्पेसिफिकेशन
वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, बोट स्मार्ट रिंगमध्ये तुम्हाला आरोग्य आणि फिटनेसशी संबंधित अनेक ट्रॅकर्स मिळतील. याद्वारे, तुम्ही तुमच्या दिवसभरातील शारीरिक हालचालींचा मागोवा घेऊ शकाल. या अंतर्गत, आपण पायऱ्या मोजणे, बर्न झालेल्या कॅलरी, प्रवास केलेले अंतर आणि लक्ष्यांसह अनेक गोष्टी सहज माहित करून घेऊ शकता.
याशिवाय, तुम्ही हृदय गती देखील मोजू शकाल. तसेच, यात शरीराचे तापमान आणि SpO2 निरीक्षण देखील आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला रिंगमधून ब्लड ऑक्सिजन, स्लीप मॉनिटरिंग आणि मेन्स्ट्रुअल ट्रॅकर सारखे फीचर्स देखील मिळतील.
स्लीप मॉनिटरिंग अंतर्गत, तुम्हाला तुमचा एकूण झोपेचा कालावधी, झोपेचा पॅटर्न यासारख्या गोष्टी पाहण्याची सुविधा मिळेल. मासिक पाळी ट्रॅकरद्वारे महिला त्यांच्या मासिक पाळीच्या चक्राचा मागोवा घेऊ शकतील. स्मार्ट टच कंट्रोलसह येणारी boAt ची स्मार्ट रिंग लवकरच भारतात लॉन्च केली जाऊ शकते. त्यामुळे ही रिंग तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे.