आर्थिक

Bonsai Plant Business : जपान तंत्रज्ञानाचा हा अनोखा व्यवसाय खास भारतीयांसाठी ! फक्त २०० रुपयांत तयार करा आणि विका ३००० रुपयांना…

हा एक असा व्यवसाय आहे ह्यामध्ये गुंतवणूक थोडीच आहे, मात्र मोठा आहे. हा व्यवसाय देशात जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलेला नाही, त्यामुळे तुमच्यासाठी ही संधी असू शकते.

Bonsai Plant Business : जर तुम्ही स्वतःचा नवीन व्यवसाय करण्याची कल्पना आखत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक असा व्यवसाय आणला आहे जो तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये सुरु करून लाखो रुपये सहज कमवू शकता.

हा व्यवसाय जपान तंत्रज्ञानाचा आहे. आम्ही तुम्हाला बोन्साय व्यवसायांबद्दल सांगत आहे. सर्वप्रथम तुम्ही हा व्यवसाय नक्की काय आहे हे जाणून घ्या.

हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये झाडाची उंची खुंटवून ते लहान ठेवणे. म्हणजेच एखादे झाड वेगात वाढत असेल तर त्याची उंची वाढू देऊ नये. यामुळे ते झाड दिसायला खूप आकर्षक दिसते, व ते ऑफिस, घर, हॉटेल्स, याठिकाणी डेकोरेशनसाठी ठेवले जाते. सध्या लोक मोठ्या प्रमाणात घरात डेकोरेशनसाठी हे झाड खरेदी करतात.

हे झाड तयार करण्यासाठी तुम्हाला २५० रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. मात्र मोठ्या प्रमाणात मागणी असणारे हे झाड तुम्ही ३ हजार रुपयांपर्यंत सहज विकू शकता. म्हणजेच या व्यवसायात तुम्हाला खूप फायदा होणार आहे.

बोन्सायच्या झाडाचा खर्च व उत्पन्न

हे झाड तयार करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक वर्ष लागू शकतात. व जास्तीत जास्त यासाठी तुम्हाला ५ वर्ष लागू शकतात. हे सर्व झाडाच्या जातींवर अवलंबून आहे.

यासाठी तुम्ही ३ महिन्याच्या वेळात १०० झाडे घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला वर्षाला ४०० झाडे घेऊन त्याची देगभाल करू शकता. यासाठी तुम्हाला १ लाख रुपये खर्च येणार आहे.

अशा प्रकारे जर तुमच्या ३ महिन्याच्या १०० झाडांमधून ८० झाडे चांगली आली व त्याची विक्री झाली तर तुम्ही त्यातून १ लाख ६० हजार रुपये कमवू शकता. म्हणजेच जर एक वर्षाचा हिशोब काढला तर तुम्ही ६ लाख ४० हजार रुपये कमवू शकता.

दुसरा मार्ग

जर तुम्हाला ही झाडे तयार करता येत नसतील तर तुम्ही नर्सरींमधून स्वस्तात ही झाडे खरेदी करून मोठ्या शहरात वेगवगेळ्या ठिकाणी चांगल्या किमतीत त्याची विक्री करू शकता. यातून देखील तुम्ही खूप नफा मिळवू शकता. मात्र यासाठी तुमच्याकडे या शहरात मार्केटिंग करणे खूप गरजेचे आहे , ज्यामुळे तुमचे ग्राहक वाढतील.

बोन्सायचे झाड कसे तयार करायचे?

यासाठी जर तुम्ही वडाचे झाड घेतले तर सर्वप्रथम तुम्हाला ते ३ महिने वाढून द्यायचे आहे. त्यानंतर त्याला आकार देण्यासाठी अल्युमिनियमच्या तारेने गोलाकार पद्धतीने बांधायचे आहे, यामुळे त्याला वेगळा आकार बनेल व त्याची वाढ देखील खुंटेल. व त्याची वाढ झाली तर तुम्ही त्याची छाटणी करू शकता. अशा प्रकारे हा व्यवसाय तुम्हाला खर्चाच्या १० पट पैसे कमावून देणारा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button