कर्जतला मध्यम; मिरजगावला सर्वाधिक पाऊस
कोंभळी मंडळात अवघा १३ मिमी पावसाची नोंद झाली. दीर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले; मात्र तालुक्यास मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

कर्जत शहर व तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाने काहीअंशी दिलासा मिळाला. तालुक्यात सर्वाधिक ६५ मिमी पाऊस मिरजगाव महसूल मंडळात पडला असून
कोंभळी मंडळात अवघा १३ मिमी पावसाची नोंद झाली. दीर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले; मात्र तालुक्यास मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यंदा कर्जत तालुक्यात पावसाने चांगलीच दडी मारली. आजमितीस मागील जवळपास साडेतीन महिन्यांत अवघे दोन-तीन दमदार पाऊस झाले
त्यानंतर रिमझिम पावसावरच खरिपाची काहीअंशी पिके आली. गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता.
संध्याकाळी सहाच्या सुमारास मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाने कर्जत शहरासह तालुक्यतील जवळपास सर्वच गावांत हजेरी लावली. यामध्ये मिरजगाव मंडळ क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सर्वांत कमी लगतच्या कोंभळी मंडळात झाली.
ऑगस्ट महिना निरंक गेल्याने डोळ्यादेखत उगवून आलेली पिके जळून जात होती; मात्र पावसाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गुरुवारी पडलेल्या पावसाने पिकांना दिलासा मिळत जीवदान लाभले.
मंडळनिहाय पाऊस असा..
कर्जत- २७.५ मिमी, मिरजगाव ६५.८ मिमी, माहीजळगाव- ३१.३. राशीन – १७.३, भांबोरा- १६.३. कोंभळी- १३.
■गुरुवारी संध्याकाळी कर्जतसह तालुक्यातील बहुतांश गावांत पडलेल्या पावसाने खरीप हंगामातील मका, तूर, कापूस पिकांना जीवनदान मिळाले. या पावसाचा ज्वारी पिकासही फायदा होणार आहे; मात्र अद्यापही तालुक्यास दमदार पावसाची आवश्यकता आहे.- पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, कर्जत