तरूणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या; पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या

तरूणावर चाकू हल्ला करून बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडणार्या प्रेम नरेंद्र भाकरे (वय 19), कुबड्या ऊर्फ किरण दशरथ पालवे (वय 23), ढाच्या ऊर्फ नाविन्य संजय भाकरे (वय 18),
आशिष अशोक भाकरे (वय 25), चायनिज ऊर्फ प्रविण विजय मिरपगार (वय 23 सर्व रा. नागापूर, अहमदनगर) यांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे.
न्यायालयाने त्यांना 3 एप्रिल, 2022 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अल्ताफ अल्हाउद्दीन बागवान (वय 25 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) या तरूणावर आरोपींनी हल्ला केला होता.
17 मार्च, 2022 रोजी रात्री साडेदहा वाजता नागापूर येथील सेंट मेरी चर्च येथे ही घटना घडली होती. फिर्यादी बागवान हा तरूण रिक्षा चालवतो.
17 मार्चच्या रात्री 11 वाजता आरोपींनी त्याला फोन करून नागापूर येथील सेंट मेरी चर्च समोर बोलून घेतले. बागवान हा येताच आरोपींनी त्याच्यावर चाकू हल्ला केला.
तसेच बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करत आहेत.
त्यांच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली असून अद्याप तीन आरोपी पसार आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.