अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: तीन ठिकाणी सुरू असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अहमदनगर – पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने आज, बुधवार रात्री नेवासा फाटा परिसरात एकाच वेळी तीन हाॅटेलवर छापा टाकून हायप्रोफाइल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.

 

उपअधीक्षक मिटके यांना सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे, बाबत गुप्त बातमी मिळाली होती. त्यावरून नेवासा फाटा परिसरात हॉटेल पायल, हॉटेल नामगंगा व हॉटेल तिरंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन सात पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.

 

त्यानुसार आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. एकाच वेळी तीन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

 

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, निरीक्षक हर्षवर्धन गवळी, निरीक्षक विजय करे, निरीक्षक विलास पुजारी, सहायक निरीक्षक मानिक चौधरीं व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button