अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात होणार खतरनाक पाऊस ! कधी पडणार नक्की वाचा…
गारपिटीमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी याेग्य नियाेजन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.

राज्यात नगरसह जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे या जिल्ह्यामध्ये गुरुवारी (दि.१६) व शुक्रवारी (दि.१७) गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात १६ ते १८ मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह जाेरदार पाऊस बसणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
गारपिटीमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी याेग्य नियाेजन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जाेरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा.