आर्थिक

BSNL Recharge Plan : एअरटेल-जिओला मोठी टक्कर ! BSNL ने आणला 197 रुपयांमध्ये 70 दिवस चालणारा प्लॅन

BSNL ने ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. यामध्ये त्यांना 197 रुपयांमध्ये 70 दिवस फ्री अमर्यादित कॉलिंग-डेटा आणि मेसेजिंग सुविधा मिळणार आहे.

BSNL Recharge Plan : जर तुम्ही BSNL चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कंपनीने तुमच्यासाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 197 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

या रिचार्ज प्लॅनमध्ये भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने ग्राहकांसाठी एक विशेष प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमुळे Jio आणि Airtel सारख्या टेलिकॉम कंपन्यांची चिंता वाढली आहे. कारण ग्राहक या कंपन्याकडून मन वळवण्याची शक्यता आहे.

विशेष बाब म्हणजे या प्लानमध्ये 197 रुपयांमध्ये 70 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग-डेटा आणि मेसेजिंग सुविधा उपलब्ध आहे. तर एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन 155 रुपयांपासून सुरू होतो. तुम्ही या प्लॅन सविस्तर जाणून घेऊ शकता.

Advertisement

BSNL चा 197 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNL च्या 197 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 70 दिवसांची आहे. म्हणजेच, तुम्हाला 197 रुपयांमध्ये 2 महिने आणि 10 दिवसांची वैधता मिळेल. यानुसार 70 दिवसांचा मासिक खर्च पाहिला तर तो 84 रुपये येतो.

या प्लॅनची ​​रोजची किंमत 2 रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. जर आपण 30 दिवसांच्या प्लॅनवर नजर टाकली तर या प्लॅनची ​​किंमत 84 रुपये आहे. जर तुम्ही कमी बजेटच्या प्लॅन शोधत असाल तर ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

Advertisement

70 दिवस हवे तितके बोला

भारत संचार निगम लिमिटेडचा (BSNL) 197 रुपयांचा प्लॅन 70 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग ऑफर करतो. यूजर्सला दररोज 2GB डेटा मिळेल. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 40 Kbps पर्यंत जातो.

याशिवाय या प्लॅनमध्ये 100 एसएमएसही मोफत मिळणार आहेत. तुम्हाला ZING मध्ये प्रवेश देखील मिळेल. तसेच महत्वाचे म्हणजे या प्लॅनमधील सर्व मोफत फायदे फक्त 15 दिवसांसाठी उपलब्ध असतील. व या प्लॅनची ​​वैधता 70 दिवसांची आहे परंतु हे फायदे 15 दिवसांसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे तुम्ही या प्लॅनविषयी सविस्तर विचार करू शकता.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button