अहमदनगर

सराईत गुन्हेगाराची दादागिरी; महिलेला छेडल्यानंतर साक्षीदाराला कोर्टात धमकावले

अहमदनगर- तोफखाना पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार फैजान कलीम बागवान विरोधात विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल आहे. यात खूनाचा प्रयत्न या वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पीडित विवाहितेच्या अंगावर दुचाकी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याचे समोर आले आहे.

 

यामुळे बागवानविरोधात खूनाचा प्रयत्न या वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याने या गुन्ह्यातील साक्षीदाराला दम दिल्याची घटना घडली. या प्रकरणी बागवान विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तोफखाना पोलीस ठाण्याचे अंमलदार दत्तात्रय कोतकर यांनी फिर्याद दिली आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बागवान याला अटक करून सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी बागवान याने दाखल गुन्ह्यातील साक्षीदाराला दम दिला. मी कोर्टातुन बाहेर सुटून आल्यावर तुझ्याकडे पाहुन घेईल, असा दम दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button