अहमदनगर

बस चालकाला मारहाण भोवली; मारहाण करणारा अटकेत

३० मार्च, २०२२ रोजी शेवगाव डेपोतील बस चालकास मारहाण करणाऱ्या आरोपीच्या भिंगार कॅम्प पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. प्रज्योत उर्फ शिवम प्रकाश लुनिया (वय ३५ रा. ब्राम्हण गल्ली, भिंगार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

३० मार्च रोजी शेवगाव डेपोतील बस चालक गणेश गोरक्षनाथ शेळके (वय ४१ रा. खांडगाव ता.पाथर्डी) हे एसटी बस (एमएच ४० एन ८७५०) माळीवाडा बस स्थानकातून शेवगावकडे घेवून होते.

भिंगार येथील समाधान हॉटेलजवळ दुचाकीवरील (एमएच १६, सीएन ४७७१) अज्ञात आरोपींनी एसटी बसला दुचाकी आडवी लावून बस चालकास शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली होती.

या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी प्रज्योत उर्फ शिवम प्रकाश लुनिया हा दुचाकीसह पोलीस ठाण्यात हजर झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. यातील दुसरा आरोपी तेजस वामन (पूर्ण नाव माहिती नाही, रा. वडारवाडी, भिंगार) हा अद्यापही पसार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button