अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात मन हेलावून टाकणारा अपघात ! एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू…

Ahmednagar News : शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. नगर मनमाड महामार्गावर एका बसने कारला जोराची धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर एक महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे, परंतु, वाटेतच दोघांचाही मृत्यू झाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, या गाडीचा चक्काचूर झाला. घटनास्थळावरच दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एक महिला आणि पुरूषाचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर एक महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. त्याच दरम्यान दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. हे सर्व जण एकाच कुटुंबातले होते.

अहमदनगर-मनमाड मार्गावर आज दुपारी हा भीषण अपघात घडला. मध्य प्रदेशमधील एक कुटुंब शिर्डीमध्ये दर्शनासाठी आले होते. शिर्डीत दर्शन घेऊन शनि शिंगाणापूरला हे कुटुंब कारने चालले होते. राहुरी तालुक्यातील गुहा गावाजवळ पोहोचले असता या भाविकांच्या गाडीला बसने उडवले.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. मुलगा आणि एका महिलेची प्रकृतीही गंभीर होते, त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचाही वाटेत मृत्यू झाला.अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button