Business Idea : कमी गुंतवणुकीत मालामाल करणारा व्यवसाय! घरबसल्या सुरु करा हा व्यवसाय आणि दरमहा कमवा दीड लाख रुपये…
तुम्हीही नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर कमी गुंतवणूक चांगला नफा देणारा एक व्यवसाय आहे. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या देखील सुरु करून चांगला नफा कमवू शकता.

Business Idea : आजकाल अनेकजण नोकरी सोडून व्यवसायाच्या शोधात आहेत. तसेच अनेकांना स्वतःचा छोटा का होईना पण स्वतः मालक असणारा व्यवसाय हवा आहे. मात्र अनेकजण चुकीच्या पद्धतीने व्यवसायाची सुरुवात करतात आणि त्यांना त्यामध्ये अपयश येत असते.
व्यवसाय सुरु करताना अने क गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण व्यवसायाची सुरुवात करताना त्याला बाजारात मागणी आहे की नाही हे सर्वात प्रथम पाहिले पाहिजे. अन्यथा जर तुम्ही सुरु करत असलेल्या व्यवसायाची बाजारात मागणी नसेल तर तुम्हाला त्यामध्ये तोटा सहन करावा लागेल.
तुम्हीही एका चांगल्या व्यवसायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अगरबत्ती उत्पादनाचा सर्वोत्तम व्यवसाय आहे. कारण भारत हा एक धार्मिक देश म्हणून ओळखला जातो. देवाची पूजा करताना किंवा कोणतेही शुभ काम करताना अगरबत्ती वापरली जाते त्यामुळे बाजारात अगरबत्तीला प्रचंड मागणी आहे.
जर तुम्हाला अगरबत्तीचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला त्याअगोदर अनेक गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. त्यानंतर तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीमध्ये आणि छोट्या जागेत हा व्यवसाय सुरु करू शकता.
अगरबत्तीसाठी लागणारी काडी बांबूच्या लांब, पातळ काडीपासून बनवली जाते. नैसर्गिकरीत्या सुगंधित फुलांची सुगंधी पेस्ट किंवा चंदनसारख्या इतर प्रमुख सुगंधी लाकडाची पेस्ट अगरबत्तीला लावली जाते. बाजारात सुगंधी अगरबत्तीला प्रचंड मागणी आहे.
भारताच नाही तर जगातील ९० देश अगरबत्तीचा वापर करतात. मात्र भारत हा एकमेव देश आहे जो अगरबत्ती बनवतो. भारतात बनवल्या जाणाऱ्या अगरबत्तीची विदेशात देखील चांगली मागणी आहे.
घरबसल्या तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता
जर तुम्हाला अगरबत्ती निर्मितीचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही अगदी तो घरबसल्या देखील करू शकता. कारण तुम्हाला यासाठी जागा किंवा कोणतेही स्टोअर विकत घेण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक परवाना घ्यावा लागेल.
परवाना आवश्यक
कंपनी नोंदणी
जीएसटी नोंदणी
स्थानिक प्राधिकरणाकडून व्यापार परवाना
कारखाना परवाना
प्रदूषण प्रमाणपत्र
SSI नोंदणी
व्यवसायात किती गुंतवणूक करावी लागेल
तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हाला अगरबत्तीचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही कमी बजेटमध्ये देखील करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला 40,000 ते 80,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. तसेच दरमहा उत्पादन तयार करण्यासाठी तुम्हाला ५० हजारांचा खर्च येईल.
व्यवसायातून नफा
तुमच्यासाठी अगरबत्ती निर्मितीचा व्यवसाय अगदी सर्वोत्तम आहे. यासाठी तुम्हाला जास्त पैसे गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुम्ही कमी गुंतवणुकीत दरमहा 1,50,000 रुपयांची उलाढाल करू शकतात. यामधून तुम्ही दरमहा 65,000 ते 75,000 रुपये नफा कमवू शकता.