आर्थिक

Business Idea: महिलांसाठी उत्तम व्यवसाय ! आजच सुरु करा, 80 टक्के खर्च सरकार देईल; कमवाल बारमाही पैसाच-पैसा

तुम्ही फक्त 2 लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरु करू शकता. हा व्यवसाय महिलाही सुरु करू शकतात. हा कमी गुंतवणुकीमध्ये चालणार व्यवसाय आहे.

Business Idea: आजकाल लोक स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खूप धरपड करत आहेत. मात्र सहसा, जेव्हा कोणी नवीन व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याचा व्यवसाय प्रत्येक हंगामात चालला पाहिजे अशी त्याची इच्छा असते.

मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण आज आम्ही तुमच्यासाठी एक सुपरहिट व्यवसाय आणला आहे जो बारमाही चालून तुम्हाला खूप पैसे कमवून देईल. या उत्पादनाला गावांपासून शहरांपर्यंत प्रचंड मागणी आहे.

आम्ही तुम्हाला टोमॅटो सॉसच्या व्यवसायाबद्दल सांगणार आहे. हा प्रत्येकाच्या आहारातील घटक आहे, त्यामुळे याला बाजारात खूप मागणी आहे. टोमॅटोचा समावेश प्रत्येकाच्या आहारात असतो.

आजकाल चटणी सुद्धा त्याशिवाय अपूर्ण समजली जाते. भाज्यांपासून ते सॉस, केचप किंवा पिझ्झा, बर्गर इत्यादी सर्व गोष्टींमध्ये याचा वापर केला जातो. वर्षातील 12 महिने बाजारात टोमॅटोला मागणी असते. याला जास्त प्रमाणात मागणी ही घरांमध्ये किंवा हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये असते.

टोमॅटो सॉस व्यवसायासाठी किती खर्च येतो?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करते. पंतप्रधान मुद्रा योजनेसाठी तयार केलेल्या प्रकल्प प्रोफाइलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो सॉस व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 7.82 लाख रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये तुम्हाला स्वतःहून 1.95 लाख रुपये गुंतवावे लागतील.

मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्ज घेऊन उर्वरित पैशांची व्यवस्था केली जाईल. यामध्ये सर्व प्रकारची यंत्रसामग्री आणि उपकरणे यासाठी दोन लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

टोमॅटो, कच्चा माल, साहित्य, कामगारांचे पगार, पॅकिंग, टेलिफोन, भाडे आदींवर 5.82 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच मुदत कर्ज 1.50 लाख रुपये असेल. खेळते भांडवल कर्ज 4.36 लाख रुपये असेल. हे कर्ज कोणत्याही बँकेतून तुम्हाला सहज मिळू शकते.

टोमॅटो सॉसची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे

प्रत्येक वयोगटातील लोक त्यांच्या जेवणात टोमॅटोचा वापर करतात. साधारणपणे हंगामात टोमॅटोचे भाव खूपच कमी असतात. परंतु ऑफ सीझनमध्ये त्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

अनेक प्रकारच्या फास्ट फूडमध्ये टोमॅटोचा वापर होत असल्याने त्याची मागणी वर्षानुवर्षे वाढत आहे. टोमॅटोला ग्रामीण भागापासून शहरे, छोटी शहरे, मेट्रो शहरांपर्यंत मागणी आहे. अशा परिस्थितीत टोमॅटोमुळे तुम्हाला व्यवसायाची चांगली संधी मिळते.

टोमॅटो सॉसमधून किती कमाई कराल?

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अहवालानुसार, 7.82 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह, वार्षिक उलाढाल 28.80 लाख रुपये असू शकते. वार्षिक खर्च 24.22 लाख रुपये असू शकतो. उलाढालीतून खर्च वजा केल्यावर तुमच्याकडे 4.58 लाख रुपये शिल्लक राहतील. हा तुमचा वार्षिक निव्वळ नफा असेल. म्हणजेच तुम्हाला दरमहा सुमारे 40,000 रुपये मिळतील.

टोमॅटो सॉस कसा बनवला जातो?

टोमॅटो सॉस बनवण्याचे युनिट स्थापित करण्यासाठी तुम्हाला मोठ्या जागेची गरज नाही. सॉस तयार करण्यासाठी, सर्व प्रथम कच्चे आणि पिकलेले टोमॅटोचे लहान तुकडे करून वाफेच्या केटलमध्ये उकळले जातात.

यानंतर, उकडलेल्या टोमॅटोचा लगदा तयार केला जातो आणि बिया आणि फायबर वेगळे केले जातात. त्यात आले, लसूण, लवंगा, काळी मिरी, मीठ, साखर, व्हिनेगर इ. पल्पमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह देखील टाकले जातात जेणेकरून ते जास्त काळ खराब होऊ नये, अशा प्रकारे टोमॅटो सॉस बनवला जातो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button