Business Idea : घरच्या- घरी पैसे कमवण्याचा उत्तम पर्याय ! फक्त सुरु करा ‘हे’ 3 व्यवसाय, महिन्याला कमवाल लाखो रुपये
घराच्या रिकाम्या छतावर तुम्ही असे अनेक व्यवसाय करू शकता. यामुळे तुम्हाला दर महिन्याला मोठे पैसे मिळू लागतील.

Business Idea : देशात असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही घरबसल्या सुरु करून त्यातून खूप पैसे कमवू शकता, आजही आम्ही तुमच्यासाठी असेच काही व्यवसाय सांगणार आहे जे तुम्हाला खूप पैसे कमवून देतील.
या व्यवसायांत नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे. तसेच तुमची दर महिन्याला बंपर कमाई असेल. दरम्यान तुम्ही, घराच्या छतावर टेरेस फार्मिंग, सोलर पॅनल, मोबाईल टॉवर, होर्डिंग, बॅनर असे अनेक व्यवसाय सुरू करता येतात. टेरेस भाड्याने घेऊनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. असे व्यवसाय लहान शहरांपासून मोठ्या शहरांमध्ये सुरू करता येतात.
अनेक बिझनेस इंडस्ट्री तुम्हाला छतासाठी चांगली योजना आणि पैसे देतात. ज्या अंतर्गत ते तुम्हाला मोठी रक्कम देखील देतात. बाजारात अशा अनेक एजन्सी आहेत ज्या तुमच्या छताच्या जागेनुसार व्यवसाय देऊ शकतात.
टेरेस शेती व्यवसाय
सर्वप्रथम टेरेस फार्मिंगबद्दल बोलूया. जर तुम्ही मोठ्या घरात राहत असाल आणि तुमची गच्ची असेल तर तुम्ही तुमच्या टेरेसवर शेती करून सहज पैसे कमवू शकता. त्यासाठी छतावर पॉलीबॅगमध्ये भाजीपाल्याची रोपे लावावी लागतील. टेरेस गार्डनिंगची संकल्पना जागेवर अवलंबून असते. ठिबक पद्धतीने पाणी देता येते. मात्र तुमच्या गच्चीवर चांगला सूर्यप्रकाश पडतो का हे लक्षात ठेवा.
सोलर पॅनल बसवून पैसे कमवा
तुम्ही तुमच्या छतावर सोलर प्लांट लावून व्यवसाय करू शकता. यामुळे तुमचे विजेचे बिल तर वाचू शकतेच, शिवाय मोठी कमाईही होऊ शकते. आजकाल सरकारही या व्यवसायाला चालना देत आहे.
मोबाईल टॉवरमधून बंपर कमाई
जर तुमच्या इमारतीचे छत रिकामे असेल तर तुम्ही ते मोबाईल कंपन्यांना भाड्याने देऊ शकता. मोबाईल टॉवर बसवल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून दर महिन्याला काही रक्कम दिली जाते. त्यासाठी स्थानिक महापालिकेची परवानगी घ्यावी लागेल. जर तुम्हाला घरी मोबाईल टॉवर बसवायचा असेल तर तुम्ही थेट मोबाईल कंपन्या किंवा टॉवर चालवणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधू शकता.
होर्डिंग्ज आणि बॅनरमधून कमाई
जर तुमचे घर एखाद्या प्राइम लोकेशनमध्ये असेल, जे दूरवरून सहज दिसेल किंवा मुख्य रस्त्याला लागून बांधले असेल, तर तुम्ही तुमच्या छतावर बॅनर किंवा होर्डिंग्ज लावून चांगले पैसे कमवू शकता.
यासाठी, तुम्ही हव्या त्या एजन्सीशी संपर्क साधू शकता, जी सर्व प्रकारची मंजुरी घेईल आणि आपल्या छतावर होर्डिंग्ज लावेल. त्यानुसार मालमत्तेच्या जागेच्या आधारावर होर्डिंगचे भाडे ठरवले जाते. ज्यामुळे तुम्ही काहीही न करता या व्यवसायातून चांगले पैसे कमवू शकता.