Indian Railways : ट्रेन केवळ एका प्रवाशाला जाऊ शकते का? रेल्वेचे नियम काय सांगतात ? पहाच…
प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करावा, ही रेल्वेची जबाबदारी असते. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना एका शहरातून दुसऱ्या शहरात सहज प्रवास करता येतो.

Indian Railways : आजकाल बहुतांश लोकांना रेल्वेने प्रवास करायला आवडतो. त्यामुळे भारतीय रेल्वेतून दररोज हजारो लोक प्रवास करतात.
प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करावा, ही रेल्वेची जबाबदारी असते. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना एका शहरातून दुसऱ्या शहरात सहज प्रवास करता येतो.
रेल्वे हे सर्वसामान्यांसाठी प्रवासाचे उत्तम साधन मानले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एकच प्रवासी असेल तरी देखील ट्रेन त्या एका प्रवासी करता चालवली जाऊ शकते का?
रेल्वेतून प्रवास न केलेला क्वचितच कोणी सापडेल. मात्र, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नसतात. जेव्हा लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल कळते, तेव्हा ते आश्चर्यचकित होतात.
महिलेच्या आग्रहापुढे भारतीय रेल्वे झुकली
भारतीय रेल्वेच्या जनरल क्लासच्या एका डब्यात 300 ते 350 प्रवासी बसू शकतात. राजधानी, शताब्दी ट्रेनमध्ये साधारणपणे 72 जागा आणि स्लीपर क्लासच्या डब्यांमध्ये 72 जागा असतात.
आता आम्ही तुम्हाला एका घटनेबद्दल सांगणार आहोत. ट्रेनमध्ये फक्त एकच प्रवासी आणि त्या प्रवाशाला घेऊन ट्रेनला जावे लागले.
डिसेंबर 2021 मध्ये एका महिलेच्या आग्रहासमोर भारतीय रेल्वेला झुकावे लागले. इतकंच नाही तर राजधानी एक्सप्रेस केवळ एका प्रवासासाठी चालवावी लागली.
राजधानी एक्सप्रेस रांचीच्या दिशेने निघाली होती, मात्र एका आंदोलनामुळे तिला डाल्टनगंज रेल्वे स्थानकावर थांबावे लागले.
डाल्टनगंज रेल्वे स्थानक ते रांची हे अंतर 308 किमी आहे. या गाडीत तब्बल 950 प्रवासी प्रवास करत होते. यातील प्रवाशांसाठी रेल्वेने बसची व्यवस्था केली.
या सर्वांना बसने रांचीला पाठवण्यात आले, मात्र अनन्या चौधरी यांनी बसमध्ये प्रवास करण्यास नकार दिला. रेल्वे अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतरही या महिलेला काही पटले नाही.
तिने कुणाचेही ऐकले नाही. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांना तिच्या आग्रहापुढे झुकावे लागले आणि रेल्वेने तिला एकटीला रांचीला नेले.