अहमदनगर जिल्ह्यात गांजाची शेती करणारा शेतकरी जेरबंद !

वहिवाटीच्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या गांजाच्या झाडांची लागवड करुन ती बांधावर उपटून टाकली होती. सहा किलो वजनाची सुमारे ६५ हजार ७०० रुपये किमतीची गाजांची झाडे पोलिसांनी जप्त केली.
पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या फिर्यादीवरुन अंकुश नाथा शिरसाठ रा. वडुले खर्द ता.शेवगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, अंकुश शिरसाठ यांनी वडुले खुर्द गावालगत असणा-या त्यांच्या वहिवाटीच्या शेतीमध्ये (गट नंबर-९) गाजांची झाडे लावली असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी शिरसाठ यांच्या शेतामध्ये समक्ष जावून बघितल्यानंतर आठ गांजाची झाडे आढळून आली. त्यातील सात मुळासकट तर एक बुडापासून तोडून सुकण्यासाठी ठेवण्यात आले होते.
६ किलो ५७० ग्रँम वजनाचा हा गांजा सुमारे ६५ हजार ७०० रुपये किमतीचा आहे. गाजांच्या झाडासह शिरसाठ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गोरे यांच्या फिर्यादीवरुन अधिनियम १९८५ कलम २० ( ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.