Car Driving Tips : महामार्गावर वाहन चालवताना लेन कधी बदलावी? अपघात टाळण्यासाठी ‘या’ टिप्स लक्षात ठेवा
महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाणात वाढत आहे. तुम्ही वाहने चालवताना सतर्क असणे गरजेचे आहे. व यामध्ये तुमचा अनुभव खूप महत्वाचा असतो.

Car Driving Tips : आजकाल सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढत आहे. व देशात मोठ्या प्रमाणात लोक यामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. कारण दिवसोंदिवस रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत चालली आहे.
त्यामुळे वाहन चालवताना चालकाला अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अशा वेळी जर महामार्गावर वाहन चालवत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमचा अपघात टाळला जाऊ शकतो.
जर एखादे वाहन तुमच्या जवळ असेल किंवा तुमच्यापेक्षा जास्त वेगाने तुमच्या दिशेने जात असेल, तर तुम्ही लेन बदलून थांबावे. ते वाहन तुमच्याजवळून जाते तेव्हा तुम्ही लेन बदलू शकता. पण, मागून येणारे वाहन आपल्या किती जवळ आहे याचा योग्य अंदाज अनेकांना लागत नाही.
त्यामुळेच अनेक वेळा निर्णय चुकल्यामुळे अपघात घडतात. तुम्हालाही मागून येणाऱ्या वाहनांबाबत योग्य निर्णय घेण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही एक युक्ती वापरू शकता, जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
ORVM दोन भागात समजून घ्या
लेन बदलण्यापूर्वी तुमच्या मागे पाहण्यासाठी रियर-व्ह्यू मिरर आणि साइड-व्ह्यू मिरर वापरा. कोणतीही वाहने तुमच्या जवळ नसल्याची खात्री करा. हे सुनिश्चित करण्यासाठी, ORVM दोन भागांमध्ये समजून घ्या.
समजा ORVM च्या मध्यभागी एक रेषा (वरपासून खालपर्यंत) आहे. येथे, जर तुम्हाला ओळीच्या आतून मागून वाहन येताना दिसले, तर समजून घ्या की ते वाहन आणि तुमच्यामध्ये पुरेसे अंतर आहे. याचा अर्थ, तुम्ही लेन बदलू शकता.
दुसरीकडे, जर तुम्हाला मागून लाईनच्या बाहेरून वाहन येताना दिसले तर काळजी घ्या कारण ते वाहन तुमच्या जवळ आहे आणि जर तुम्ही लेन बदलली तर अपघात होण्याची शक्यता जास्त असते. अशाप्रकारे, मागून येणाऱ्या वाहनांचे अंतर अचूकपणे मोजता येईल आणि अपघाताचा धोका टाळता येईल.
या गोष्टींचीही काळजी घ्या
लेन बदलण्यापूर्वी इंडिकेटर चालू करा जेणेकरून इतर वाहनांच्या चालकांना समजेल की तुम्ही लेन बदलणार आहात. त्यानंतर, हळूहळू वाहन दुसऱ्या लेनमध्ये हलवा. तुम्ही खूप वेगाने लेन बदलल्यास, मागून येणाऱ्या वाहनांच्या चालकांना तुम्ही हैराण करू शकता, ज्यामुळे अपघात होऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.