टेक्नॉलॉजी

Car under 6 lakhs : बजेट फक्त 6 लाख ! खरेदी करा या दोन स्टायलिश कार, जाणून घ्या शक्तिशाली फीचर्स

या कार तुम्ही 6 लाखाच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. तुमच्यासाठी या स्वस्तात मस्त कार ठरू शकतात. याचे फीचर्सही खास आहेत.

Car under 6 lakhs : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा दोन कारबद्दल सांगणार आहे, ज्या दिसायला खूप आलिशान असून त्याची किंमतही खूप कमी आहे.

या कारला कमी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लोक स्वस्तात मस्त कार खरेदीकडे सध्या वळत असून या तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरत आहेत. कारण कमी बजेटमध्ये या कार जबरदस्त मायलेजसह येतात. या दोन्ही आकर्षक दिसणाऱ्या कार बाजारात 6 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहेत.

पहिली कार

यादीतील पहिली कार मारुती सुझुकी इग्निस आहे. ही कार 5.84 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत ऑफर करण्यात आली आहे. हे तीन ड्युअल टोनसह एकूण 9 रंग पर्यायांसह येते. यामध्ये आढळणारे एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स याला वेगळा लुक देतात. या मध्यम आकाराच्या फॅमिली कारमध्ये 1197 सीसी पेट्रोल इंजिन आहे.

मागील पार्किंग सेन्सर दिले आहेत

सुरक्षेसाठी कारमध्ये एअरबॅग्जशिवाय ABS देण्यात आले आहे. एबीएस सर्व चार चाकांना सेन्सरद्वारे नियंत्रित करते. कार 81.8 Bhp आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी इग्निस रस्त्यावर 20.89 kmpl मायलेज देते. कारमध्ये मागील पार्किंग सेन्सरसारखे प्रगत वैशिष्ट्ये आहेत. सध्या चार ट्रिम्स ऑफर केल्या जातात.

दुसरी कार

यादीतील दुसरी कार निसान मॅग्नाइट आहे. ही कार 6 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ही कंपनीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. ही 5 सीटर कार बाजारात एकूण 8 कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 1-लिटर पेट्रोल इंजिन आहे.

मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन

यामध्ये टर्बो इंजिन देखील देण्यात आले आहे. कार 72 पीएस पॉवर देते. सध्या त्याचे पाच ट्रिम बाजारात उपलब्ध आहेत. कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. Nissan Magnite चे मायलेज 19 असल्याचा दावा केला जात आहे.

सुरक्षेसाठी कारला एअरबॅग आणि एबीएस देण्यात आले आहेत. कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. याला ASEAN NCAP क्रॅश चाचणीमध्ये 4 रेटिंग मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button