महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक घटना नगर-कल्याण रोड वरील शिवाजीनगरमध्ये घडली आहे. दरम्यान या प्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे
बाळू तुकाराम विधाते, मिना बाळू विधाते, युवराज बाळू विधाते (रा. मोहटादेवी मंदिरामागे,शिवाजीनगर,अ.नगर) व शिवसेनेचे पदाधिकारी संतोष चंद्रकांत शिंदे (रा.नालेगाव,अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान याप्रकरणी मयुरी शिवाजी उल्हारे (वय 22 रा.शिवाजीनगर,नगर-कल्याण रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे कि, आरोपी बाळू विधाते हा फिर्यादी यांच्या घराजवळ राहतो.
तो नेहमी फिर्यादी यांच्या कुटूंबाला जातीवाचक शिवीगाळ करत असे. एके दिवशी बाळू विधाते व संतोष शिंदे यांनी ऋषिकेशला मारहाण केली होती.
त्याच दिवशी रात्री बाळू विधाते याने फिर्यादी यांच्या कुटूंबाला शिवीगाळ केली. दरम्यान त्यांनतर पीडित कुटूंबाने तातडीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन तक्रार दिली. यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारचा अधिक तपास पोलीस करत आहे.