गर्भपाताच्या गोळ्या जप्त प्रकरण; एसपींनी दिले ‘हे’ आदेश

ळ्या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर असून याची सर्व बाजूने चौकशी व तपास केला जाईल,
आरोपींच्या बाबतही लवकरच कारवाई केली जाईल, तसेच या गोळ्यांचा वापर कुठे केला जाणार होता, याचाही शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
5 मे रोजी एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी टाकलेल्या छाप्यात गर्भपातासाठी दिल्या जाणार्या गोळ्यांची पाकिटे जप्त करण्यात आली होती.
याप्रकरणी सावेडी येथील श्रीराम एजन्सीचे मालक नितीन बोठे, याच्यासह हरियाणा येथील औषध निर्मिती कंपनी आयव्हीए हेल्थकेअरच्या सर्व संचालकांविरोधात औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर दरंदले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. यासंदर्भात औषध प्रशासनाकडून सादर करण्यात आलेले अहवाल व इतर कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.