Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरविकासकामे करताना कधी जात-पंथ-धर्म पाहत नाही

विकासकामे करताना कधी जात-पंथ-धर्म पाहत नाही

Ahmednagar News : पाथर्डी मागील पाच वर्षांत प्रभावती ढाकणे यांनी भालगाव गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कसोशीने प्रयत्न करीत, प्रत्येक गाव वाडी-वस्तीला विकासनिधी दिला.

वेळी ग्रामपंचायत हद्दीला विकासकामांसाठी दीड कोटींचा निधी दिला. विकासकामे करताना आम्ही जात-पंथ-धर्म व मतांची टक्केवारी पाहत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनी केले.

माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांच्या विशेष पाठपुरावातून येळी येथे मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी अॅड, ढाकणे बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू बोरुडे, प्रभावती ढाकणे, पांडुरंग कराड, आबासाहेब जायभाये, अनिल बंड आदी उपस्थित होते. अॅड, ढाकणे म्हणाले, की स्वार्थी राजकारणासाठी ढाकणे कुटुंबीयांनी कधीही आपला स्वाभीमान गहाण ठेवलेला नाही.

राजकारण करताना जातीभेद केला नाही. लोकांची कामे करणे म्हणजे राजकारणात आपण त्यांच्यावर उपकार करतो, असे नाही. लोकांमुळेच स्व. बबनराव ढाकणे हे देशाच्या राजकारणात पोहोचले, त्याची जाणीव आजही आम्हाला आहे.

मागील ३० वर्षांपासून दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी अविश्रांत कार्यरत आहे. राजकारण म्हणजे केवळ मतांची गोळाबेरीज नाही, तर तो एक समाजसेवा आहे, संघर्ष करणे, अन्यायविरोधात उठाव करणे, हाच आमचा स्थायी भाव आहे. भविष्यात राजकीय दृष्टिकोनातून काहीही घडले, तरी आम्ही हा वारसा सोडणार नसल्याचे ते म्हणाले.

विकासकामांची टक्केवारी मागत नाही, मागणारही नाही. माझा प्रपंच राजकारणावर अवलंबून नाही. कोरडगाव परिसरातील ऊसउत्पादकांची कित्येक वर्षांपासून पिळवणूक होत होती.

ऊसउत्पादकांच्या मागणीनुसार आपण मागील दोन वर्षांपासून केदारेश्वर कारखान्याला ऊस नेतोय. तिथे कुणाची वशिलेबाजी चालत नाही. नोंदीनुसार सर्वांचा ऊस रितसर गाळप होतो.

कारखान्यावर अवघे २५ कोटींचे कर्ज आहे. आमचे प्रतिस्पर्धी कारखान्याची मालमत्ता कमी अन् शेकडो कोटी कर्जात बुडाला आहे.

हजारो कोटींच्या विकासाच्या गप्पा मारता, मात्र विकास अक्षरशः मातीत मिसळला जातोय. एकतर्फी कारभारातून मागील १० वर्षांपासून मतदारसंघातील सामान्य जनतेची अडवणूक सुरू आहे.

गावातून किती मते मिळाली, याची कागदे पाहून काम करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जातो. हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे ढाकणे म्हणाले. प्रास्ताविक युवा नेते शंकर बडे यांनी, तर विकी डमाळे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments