Cement Price Hike : घर बांधणाऱ्यांना मोठा झटका ! सिमेंटचे दर पुन्हा वाढले; जाणून घ्या एका बॅगची किंमत…
घर बांधण्यासाठी सिमेंट खूप म्हत्वाचे असते. मात्र सिमेंटच्या किमती वाढत असल्याने घर बांधण्याचे बजेट वाढते होते. जे सर्वसामान्य लोकांसाठी खूप डोकेदुखी ठरत आहे.

Cement Price Hike : सर्वांना स्वतःचे घर असावे असे वाटत असते. सध्या देशात मोठ्या संख्येने लोक हे भाड्याच्या घरात राहत आहेत. कारण स्वतःचे घर बांधण्यासाठी होणार खर्च ते पेलू शकत नाहीत.
अशा वेळी जर तुम्ही घर बांधण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण सिमेंट कंपन्यांकडून पुन्हा एकदा किंमत वाढवण्याची तयारी सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये सिमेंटच्या किमतीत वाढ होणार आहे.
हे दर 1 ऑक्टोबरपासून दक्षिण आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये सिमेंट महाग होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तर दक्षिण भारतात सिमेंटचे दर प्रति बॅग 30-40 रुपयांनी वाढू शकतात. त्याच वेळी, उत्तरेमध्ये प्रति बॅग 10 ते 20 रुपयांनी वाढू शकते.
प्रति पोती 10 ते 35 रुपयांनी भाव वाढले
जर याआधीचा विचार केला तर सप्टेंबरच्या सुरुवातीलाही सिमेंट कंपन्यांनी प्रति बॅग 10 ते 35 रुपयांनी वाढ केली होती. त्यावेळी देशातील सर्वच भागात सिमेंटचे भाव वाढले होते. ऑगस्टमध्येही दर महिन्याला 1 ते 2 टक्क्यांनी वाढले होते. सिमेंटच्या दरात वाढ होण्यामागे मागणी वाढल्याचे सांगितले जात आहे. कमी पावसामुळे सिमेंटची मागणी वाढली आहे. त्यामुळे सिमेंटची कमतरता लक्षात घेता आता कंपन्यांनी दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
किंमत 40 रुपयांनी वाढू शकते
सिमेंटच्या दरात वाढ झाल्यामुळे दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांचा ऑपरेटिंग नफा (EBITDA) चांगला राहण्याची अपेक्षा आहे. मार्जिन किमतींमध्ये वाढीसह ऊर्जा खर्चात घट झाल्याने याला पाठिंबा मिळेल. तसेच सिमेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. दरम्यान, 1 ऑक्टोबरपासून दक्षिण आणि उत्तर भारतात सिमेंटच्या किमती वाढतील. यामध्ये प्रति बॅग 10 ते 40 रुपयांनी वाढू शकते.
दरम्यान, Axis Securities ने Rs 9,520 चे टार्गेट असलेल्या अल्ट्राटेक सिमेंटला ‘बाय’ करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये ब्रोकरेजने सांगितले की कंपनीची सेंआर्गेनिक कॅपिसिटी एक्सपेंशन योजना चांगली प्रगती करत आहे. व आगामी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये, कंपनीची ग्राइंडिंग क्षमता 135.1 mtpa वरून 165 mtpa पर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे.