Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरकेंद्र सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी !

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी !

Ahmednagar News : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत ठोस निर्णय घेत नसल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना सामूहिकरित्या आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी,

अशा मागणीचे लेखी निवेदन शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला पूर्णपणे विसर पडला आहे. सन २०१४ च्या जाहीरनाम्यात भाजप सरकारने नमूद केले होती की,

सत्तेवर येताच शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमीभाव देऊ तसेच स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू करू पंरतु केंद्रात भाजपाची सत्ता येताच त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला.

सन २०२३ या वर्षी खरीप हंगामात अत्यंत कमी पाउस पडल्याने कापूस, सोयाबीन, तूर, कांदा उत्पन्नात मोठी घट झाली. केंद्र सरकारने शेतीमालाची निर्यात बंद केल्याने शेतीमालाचे भाव पडले,

त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त केला. खरीप हंगामातील पिकांचा विम्याचा आजतागायत एक रुपयादेखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नात गंभीर नसेल तर आम्ही शेतकरी जगून तरी काय उपयोग? म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सामूहिकरित्या आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, असे कापरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments