Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरनारायणगव्हाण ग्रामस्थांचे महामार्गावर 'चक्का जाम'

नारायणगव्हाण ग्रामस्थांचे महामार्गावर ‘चक्का जाम’

Ahmednagar News : नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण येथे अपघातांची मालिका सुरूच असताना महामार्गावरील अपघातग्रस्त बनलेल्या नारायणगव्हाण गावातील ग्रामस्थ जीव मुठीत धरून रस्त्यावर प्रवास करत असून,

शालेय विद्याथ्यांचा रस्त्यावरचा प्रवास अत्यंत गंभीर बनला आहे, वेळोवेळी निवेदने आंदोलने करूनही प्रशासकीय अधिकारी खुर्चीवरून हालायला तयार नसल्यामुळे फसवाफसवीची उत्तरे देत ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार याठिकाणी होताना दिसत असल्यामुळे रस्त्यावरची लढाई रस्त्यावर लढण्यासाठी नारायणगव्हाणकरांनी महामार्गावर चक्का जाम रास्ता रोको आंदोलन करत आपल्या वेदना मांडल्या.

या वेळी सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी आंदोलकांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेत मध्यस्थी केली. संतापलेले ग्रामस्थ न्यायासाठी रस्त्यावरून हटायला तयार नव्हते; परंतु पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून मार्ग काढू,

मी तुमच्या पाठीशी उभा राहील, अशी भूमिका घेतल्याने आक्रमक ग्रामस्थांनी विश्वास ठेवत रस्त्यावरून बाजूला येऊन ग्रामपंचायत कार्यालयलात बैठक घेतली. या वेळी उपनिभागीय अधिकारी संजय भावसार, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम अहमदनगर, मंडल अधिकारी बी. जी. पवार, तलाठी शिरसाठ भाऊसाहेब, ग्रामविकास अधिकारी गायकवाड भाऊसाहेब यांच्या समवेत कार्यालयात पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी आंदोलनकर्ते सचिन शेळके,

सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सरपंच मशिषा जाधव, मा. सरपंच विलास खोले, चेअरमन दादासाहेब शेळके, लक्ष्मण शेळके, अर्जुन वाल्हेकर, शिवाजी नवले, हुसेन शेख, किसन शेळके, विजय चव्हाण, बाळकृष्ण शेळके, मिलिंद शेळके,

मिलिंद शेळके आदींसोबत चर्चा केली. या वेळी भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी हजर नसल्याने रस्त्याच्या मोजणीचा प्रश्न उपस्थित झाला. या वेळी उपविभागीय अभियंता यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणी फी भरल्याचे सांगत आम्हाला प्रस्ताव तयार करण्यासाठी नकाशा आवश्यक असून, पक्का नकाशा मिळत नसल्यामुळे मोजणीची समस्या येत आहे.

या वेळी ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी नकाशा बनवून दिला. या वेळी मंडल अधिकारी, महसुल प्रतिनिधी बी. जी. पवार, तलाठी शिरसाठ यांना शरद पवळे यांनी धारेवर धरत तहसीलदारांनी भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे पत्र का दिले नाही, असा सवाल केला.

या वेळी तलाठी शिरसाठ यांनी तहसीलदारांना फोन करत १६ तारखेला संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची व आंदोलनकर्ते ग्रामस्थांची पारनेर येथे बैठक घेण्याचे आश्वस्त केले.

नारायणगव्हाणचा चौपदरीकरणाचा तिढा पारनेर तहसील कार्यालयात न सुटल्यास आम्ही आमरण उपोषण करू, पण रस्ता पूर्ण करू घेऊ असे आंदोलनकर्ते सचिन शेळके यांनी सांगितले.

पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी दगडू हारदे, शिवाजी शेळके, काशिनाथ कांडेकर, धोंडींबा गायकवाड, भिमा जाधव, आप्पा शेळके, भिमबाई कांडेकर, बाळासाहेब काकडे, भाऊसाहेब नाईक,

दादा ठुबे, लहानू शेळके, सुनिल शेळके, विकास पवार, बवन नवले, घनंजय नाईक, नितीन जाधव, अक्षय कांडेकर अनिल शेळके, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments