Chandrayaan 3 Separation : उद्या चांद्रयानचे होणार दोन तुकडे ! कसा असेल पुढचा प्रवास ? वाचा इथे
चांद्रयान-3 च्या आरोग्यावर बेंगळुरूमधील इस्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) केंद्राच्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) मधून सतत निरीक्षण केले जात आहे. सध्या चांद्रयान-3 ची सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत.

Chandrayaan 3 Lander Module Separation : भारताचे बहुचर्चित चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी फक्त सात दिवस उरले आहेत. आज म्हणजेच 16 ऑगस्टला सकाळी चंद्राच्या पाचव्या कक्षेत पोहोचले आहे.
चांद्रयान 150 किमी x 177 किमीच्या कक्षेत होते. ही गोष्ट 14 ऑगस्ट 2023 ची आहे. सध्या प्रोपल्शन मॉड्यूलचे रेट्रोफिटिंग चालू आहे. म्हणजेच वेग कमी करण्यासाठी वाहन विरुद्ध दिशेने जात आहे. पण उद्या म्हणजेच 17 ऑगस्टला चांद्रयान-3 चे दोन तुकडे होणार आहेत.
High five, from CHANDRAYAAN 3 to you!
The final and fifth Lunar bound orbit maneuver for the Chandrayaan-3 spacecraft was performed successfully today (August 16, 2023). The achieved orbit is 153 km x 163 km, as intended.
Separation of the Lander Module from the Propulsion…
— LVM3-M4/CHANDRAYAAN-3 MISSION (@chandrayaan_3) August 16, 2023
17 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता चांद्रयान-3 चे इंटिग्रेटेड मॉड्यूल दोन भागात विभागले जाईल. त्याचा एक भाग म्हणजे प्रोपल्शन मॉड्यूल. दुसरा भाग लँडर मॉड्यूल आहे. प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे केल्यानंतर लँडर मॉड्यूल पुढील प्रवास पूर्ण करू शकेल का? हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल.
तर उद्या विभक्त झाल्यानंतर, प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल 100 किमी x 100 किमी कक्षेत फिरू लागतील. पण काही अंतराने. जेणेकरून एकमेकांशी टक्कर होऊ नये. त्यानंतर 18 आणि 20 ऑगस्ट रोजी लँडरचे डीऑर्बिटिंग केले जाईल.
18 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 4 वाजता लँडरचे थ्रस्टर एका मिनिटासाठी चालू केले जातील. जेणेकरून योग्य दिशेने आणून वेग कमी करता येईल. त्यानंतर तेच काम 20 ऑगस्टच्या रात्री पावणेदोनच्या सुमारास करण्यात येणार आहे. चांद्रयान-3 ला अजून 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत आणायचे आहे.
आता चांद्रयान-3 शी संबंधित चार टप्पे पूर्ण झाले आहेत. पाचवा टप्पा म्हणजे प्रणोदन आणि लँडर मॉड्यूल वेगळे करणे. त्यानंतर 23 तारखेला साडेसहा वाजता लँडिंग केले जाईल. हा आठवा टप्पा असेल. लँडिंगच्या वेळी भरपूर धूळ उडण्याची शक्यता आहे. म्हणूनच धूळ स्थिर होईपर्यंत रोव्हर लँडरमधून बाहेर पडणार नाही.
यानंतर नवव्या टप्प्यात रोव्हर लँडरच्या पोटातून बाहेर येईल. बाहेर पडल्यानंतर, रोव्हर प्रज्ञान लँडरच्या आजूबाजूच्या क्षेत्राची सतत तपासणी करेल.
तपासणी केल्यानंतर, तो सतत त्याचा डेटा विक्रम लँडरला पाठवेल. लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवर फिरणाऱ्या प्रोपल्शन मॉड्यूलला त्याची माहिती देईल. येथून डेटा बेंगळुरू येथे स्थित इंडियन डीप स्पेस नेटवर्क (IDSN) द्वारे प्राप्त केला जाईल.गंमत म्हणजे जेव्हा चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर धावेल, तेव्हा त्याच्या चाकांमध्ये बनवलेल्या खास खोबण्यांमुळे राष्ट्रीय चिन्ह आणि इस्रोचा लोगो जमिनीवर तयार होईल.
चांद्रयान-3 च्या आरोग्यावर बेंगळुरूमधील इस्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) केंद्राच्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) मधून सतत निरीक्षण केले जात आहे. सध्या चांद्रयान-3 ची सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत.