Chandrayaan 3 Updates : आज भारत रचणार नवीन इतिहास ! याठिकाणी तुम्ही पाहू शकता चांद्रयान-३ चे लँडिंग लाइव्ह स्ट्रीमिंग..
आज भारतासाठी एक अभिमानाचा दिवस आहे. आज चांद्रयान 3 चंद्रावर लँडिंग करणार आहे. तुम्ही आज ते लाइव्ह पाहू शकता.

Chandrayaan 3 Updates : आज संपूर्ण भारतासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. कारण आज चांद्रयान 3 चंद्रावर लँडिंग करणार आहे. मात्र यासाठी चांद्रयान 3 समोर काही मोठी आव्हाने आहेत.
भारताची अंतराळ संस्था इस्रोने सांगिलत्याप्रमाणे चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल आज संध्याकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान चंद्राच्या त्या भागाला स्पर्श करणार आहे, जो आजपर्यंत कोणीही पाहिलेला नाही. चांद्रयान 3 साठी सॉफ्ट लँडिंगची तीन मोठी आव्हाने आहेत.
कसे असेल लँडिंग?
आज चांद्रयान-3 चे लँडर आज संध्याकाळी 5:45 वाजता चंद्राच्या दिशेने जाण्यास सुरुवात करेल आणि 6:45 वाजता इस्रो त्याचे सॉफ्ट लँडिंग करेल. चांद्रयान-३ च्या लँडर विक्रमचे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास रोव्हर त्यातून बाहेर पडून चंद्रावर चालेल आणि तेथील पाणी आणि वातावरणाची माहिती देईल. पाणी किंवा बर्फाव्यतिरिक्त, इतर अनेक नैसर्गिक संसाधने देखील चंद्रावर आढळू शकतात जे शोधण्याचा विक्रम लँडर प्रयत्न करणार आहे.
चांद्रयान 3 साठी ही तीन महत्त्वाची आव्हाने आहेत…
– लँडरचा वेग नियंत्रित करणे हे पहिले आव्हान आहे. मागच्या वेळी लँडरचा वेग जास्त असल्याने अपघात झाला होता.
– याशिवाय लँडर चांद्रयान-३ साठी दुसरे आव्हान म्हणजे लँडर लँड होताना लँडर सरळ राहिले पाहिजे.
– त्याच वेळी, लँडरसाठी तिसरे आव्हान आहे ते त्याच ठिकाणी उतरवणे, ज्याची इस्रोने निवड केली आहे. मागच्या वेळी चांद्रयान-2 खडबडीत जागी आदळल्यामुळे क्रॅश झाला होता.
चांद्रयान-३ लाइव्ह ट्रॅकर
इस्रो चांद्रयान-3 चा वेग आणि दिशा यावर सतत लक्ष ठेवून आहे. यासाठी लाईव्ह ट्रॅकरही सुरू करण्यात आला आहे. या लाइव्ह ट्रॅकरद्वारे, चांद्रयान-3 सध्या अंतराळात कुठे आहे ते पाहू शकता.
चांद्रयान-३ लँडिंग लाइव्ह स्ट्रीमिंग कसे पहावे?
चांद्रयान-3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.27 वाजता सुरू होईल. हे इस्रोच्या संकेतस्थळावर पाहता येईल… इस्रोच्या वेबसाइटवर… isro.gov.in, YouTube वर… youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss, Facebook वर… Facebook https://facebook.com/ इस्रो किंवा मग ते डीडी नॅशनल टीव्ही चॅनलवर पाहता येईल.
दरम्यान, लुना-25 क्रॅश झाल्यानंतर रशियाच्या स्पेस एजन्सीने एक विधान जारी केले की लँडर चुकीच्या कक्षेत गेला आणि नंतर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्यानंतर त्यांचे मिशन फेल झाले. जर लुना-25 क्रॅश झाला नसता, तर आज ना उद्या रशिया हा पहिला देश बनू शकला असता.