Chandrayaan 3 : चांद्रयान-3 पृथ्वीभोवती का फिरते? थेट चंद्राकडे सरळ का जात नाही? जाणून घ्या कारण

चांद्रयान 3 ने 14 जुलै 2023 रोजी LVM3 M4 रॉकेटद्वारे चंद्रावर मोहिमेसाठी लॉन्च केले आहे. सध्या चांद्रयान 3 पृथ्वीभोवती फिरत आहे.

Chandrayaan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ने चांद्रयान 3 ने 14 जुलै 2023 रोजी LVM3 M4 रॉकेटद्वारे चंद्रावर मोहिमेसाठी लॉन्च केले आहे. ही देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

असे असताना सध्या चांद्रयान 3 पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने नवीन प्रवास करत आहे. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर भारतीय तंत्रज्ञान अवकाश आणि विज्ञान क्षेत्रात नवीन उंची गाठेल. चांद्रयान 3 चा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे आणि त्याची वैज्ञानिक रहस्ये समजून घेणे हा आहे.

पण चांद्रयान 3 सध्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालत चंद्राकडे जात आहे. अशा स्थितीत लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की चंद्राच्या मोहिमेवर निघालेले चांद्रयान 3 पृथ्वीभोवती का फिरत आहे? ते थेट चंद्राच्या कक्षेत का पोहोचत नाही? या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहे.

Advertisement

चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करणे हे चांद्रयान 3 चे उद्दिष्ट आहे. चांद्रयान 3 ची मोहीम पूर्ण होण्यासाठी सुमारे 40 दिवसांचा कालावधी लागणार आहे. प्रक्षेपण झाल्यापासून, चांद्रयान 3 पृथ्वीभोवती फिरत आहे आणि चंद्राकडे जात आहे.

वास्तविक, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी, बूस्टर किंवा शक्तिशाली रॉकेट वाहन आवश्यक आहे. जर तुम्हाला थेट चंद्रावर जायचे असेल तर तुम्हाला एका मोठ्या आणि अधिक शक्तिशाली रॉकेटची आवश्यकता असेल. त्यासाठी अधिक इंधनही लागते, त्याचा थेट परिणाम प्रकल्पाच्या बजेटवर होतो. म्हणजेच चंद्राचे अंतर पृथ्वीपासून थेट ठरवले तर जास्त खर्च करावा लागेल.

तसेच पृथ्वीच्या कक्षेत प्रदक्षिणा घालताना, चांद्रयान 3 उपग्रहामध्ये असलेल्या उर्जेचा वापर करून वेग वाढवून त्याची श्रेणी वाढवते. चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेजवळ येताच ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. या प्रक्रियेला TLI म्हणतात.

Advertisement

इस्रोच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, TLI प्रक्रियेनंतर चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि चंद्राच्या जवळ घेऊन जाणार्‍या मार्गावर जाईल. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या शब्दांत, 1 ऑगस्ट रोजी, TLI प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि चंद्राच्या जवळ जाण्यासाठी आपला प्रवास सुरू करेल.

दरम्यान, TLI प्रक्रिया चांद्रयान-3 ला ‘लूनर ट्रान्सफर ट्रॅजेक्टरी’ म्हणजेच चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या प्रवासात घेऊन जाईल. तर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल.

Advertisement
Exit mobile version