अहमदनगर

‘या’ महामार्गावरील अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल

अहमदनगर- पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी 25 डिसेंबरना रात्री 12 ते 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत नगर-मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत.

 

नगर-पुणे-सोलापुरकडून मनमाडकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतुक ही कल्याण बायपास चौक, नगर-कल्याण महामार्गावरून आळेफाटा- संगमनेरमार्गे नाशिककडे किंवा विळदघाट- दूध डेअरी चौक- शेंडी बायपास-नगर औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापुर- वैजापुर- येवला मार्गे जाईल. शनि शिंगणापुर-सोनई रोडवरून मनमाड (राहुरीकडे) कडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतुक नगर-औरंगाबाद महामार्गावरुन जाईल.

 

मनमाड-येवला शिर्डीकडून नगरमार्गे पुणे- मुंबई-कल्याणकडे जाणार्‍या सर्व प्रकारची अवजड वाहतुक पुणतांबा फाटा-झगडे फाटा -झगडे फाटा- सिन्नर सिन्नर- नांदूरशिंगोटे-संगमनेर- आळेफाटा मार्गे जाईल. मनमाड-येवलाकडुन नगर-सोलापुर-बीडकडे येणार्‍या सर्व प्रकारची अवजड वाहतुक पुणतांबा फाटा येथून वैजापुर-गंगापुर-कायगाव-प्रवरासंगम-शेंडी बायपास- विळदघाट-केडगाव बायपास मार्गे जाईल.

 

लोणी- बाभळेश्वर-श्रीरामपुरकडून नगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतुक बाभळेश्वर- श्रीरामपुर-टाकळीभान-नेवासामार्गे नगरकडे येईल. या वाहतुक बदलातून ऊस वाहतुक करणारे वाहने (उदा. ट्रक, ट्रक्टर व अन्य वाहने) यांना वगळण्यात आले आहे. बस, अत्यावश्यक मालाची वाहतूक करणारी वाहने, रस्ता दुरुस्तीसाठी आवश्यक वाहने स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या वाहनांना हा आदेश लागू राहणार नसल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button