अहमदनगर

एमआयडीसीत गुन्हेगारी करणार्‍या ‘या’ टोळीवर मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र

अहमदनगर- एमआयडीसी परिसरात संघटीत गुन्हेगारी करणार्‍या भाकरे टोळी विरूध्द विशेष मोक्का न्यायालयात सुमारे 500 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोन अल्पवयीनसह एकुण सहा आरोपींचा यामध्ये समावेश आहे.

 

टोळी प्रमुख प्रेम नरेंद्र भाकरे (वय 19), टोळी सदस्य कुबड्या ऊर्फ किरण दशरथ पालवे, ढाच्या ऊर्फ नाविन्य संजय भाकरे (वय 18), आशिष अशोक भाकरे (वय 25), दोन अल्पवयीन (सर्व रा. नवनागापूर, अहमदनगर) अशी मोक्का कायद्यान्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

 

पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांच्या परवानगीने हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

 

तरूणाला फोन करून बोलून घेत चाकू व बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. अल्ताफ अल्हाउद्दीन बागवान (वय 25 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर अहमदनगरमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याने एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून खूनाचा प्रयत्न कलमान्वेय गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागापूर येथील सेंट मेरी चर्च येथे ही घटना घडली होती.

 

दरम्यान सदरचा गुन्हा भाकरे टोळीने केल्याचे समोर आले होते. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली होती. या गुन्ह्यासह भाकरे टोळीने केलेल्या इतर गुन्ह्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी काढली. भाकरे टोळीविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी प्रस्ताव पाठविला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या परवानगीने सदरचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांनी सात जणांविरूध्द मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यास मान्यता दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button