अहमदनगर

पेपरला जाणार्‍या युवतीचा पाठलाग करत दोघांनी…

पेपर देण्यासाठी शाळेत जात असताना दोघां सख्या भावांनी युवतीचा अनेकदा पाठलाग केला व तिला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यापुढेही जाऊन या पठ्ठ्यांनी तिच्या नंबर उपलब्ध करून सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्‍लील मेसेज केले.

फोन करून शिवीगाळ केले, जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी परिसरात ही घटना घडली असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित युवतीने फिर्याद दिली आहे.

सोहेल गणी शेख व सरफराज गणी शेख (दोघे रा. गजराजनगर, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा सख्या भावांची नावे आहेत. फिर्यादी युवती पेपर देण्यासाठी शाळेत जात असताना

सोहेल व सरफराज तिचा पाठलाग करत असत व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी द्यायचे. तरीसुध्द फिर्यादीने त्यांना काही प्रतिउत्तर दिले नाही.

फिर्यादी त्यांना बोलली नाही म्हणून सोहेल व सरफराज यांनी फिर्यादीच्या नंबरवरील व्हॉट्सअप व फेसबुकवरती अश्‍लील स्टीकर व बंदुक स्टीक टाकून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. फिर्यादीला फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button