अहमदनगरताज्या बातम्या
अहमदनगर ब्रेकिंग : कारने दिलेल्या धडकेत बालकाचा मृत्यू

नगर-कल्याण महामार्गावर जखणगाव (ता. नगर) येथे भरधाव वेगात नगरच्या दिशेने येणाऱ्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या १२ वर्षीय शाळकरी मुलाला जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या अपघातात साहिल अंबादास नाट (वय १२, रा. पिंपळगाव वाघा, ता. नगर) या बालकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत त्याचे वडील अंबादास भाऊसाहेब नाट यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी नाट हे पत्नी व २ मुलांसह जखणगाव येथे त्यांचे नातेवाईकांच्या घरी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेले होते. तेथून रात्री १० च्या सुमारास ते परत जाण्यासाठी कारमध्ये बसत असताना त्यांच्या मुलाचे बूट कार्यक्रमस्थळी राहिल्याने तो रस्ता ओलांडून जात असताना भाळवणीकडून नगरच्या दिशेने भरधाव वेगात येत आलेल्या कारने मुलगा साहिल यास जोराची धडक दिली होती.
Advertisement