Children Use Smartphones : लहान मुलांना कोणत्या वयात स्मार्टफोन द्यावा? योग्य वय जाणून घ्या अन्यथा मुलांच्या मानसिक आरोग्यावर होईल परिणाम
लहान मुले स्मार्टफोन वापरून मानसिक आजारांचे शिकार होत आहेत. मुलांना योग्य वेळी त्यांच्या हातात स्मार्टफोन द्यायला हवेत.

Children Use Smartphones : अलीकडच्या काळात तुम्ही पहिलेच असेल की लहान मुलांच्या हातात मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन असतात. लहान वयात स्मार्टफोन वापर केल्याने मुलांचे मानसिक आयुष्य पूर्णपणे खराब होत चालले आहे.
मुले या गोष्टी करण्यामागे पालक खूप जबाबदार असतात. पालकांचा फोन मागवण्याचा हट्ट करणारी मुलं हळूहळू स्वत:चा वेगळा स्मार्टफोन मागवण्याचा हट्ट करू लागतात. अनेक वेळा हट्टीपणात मुलं खाणं-पिणंही सोडून देतात.
मुलांना फोन देण्याचे योग्य वय कोणते?
अमेरिकेतील नॉन-प्रॉफिट मीडिया ऑर्गनायझेशन नॅशनल पब्लिक रेडिओ अर्थात NPR ने मुलांना स्मार्टफोन देण्यासाठी योग्य वयावर एक लेख प्रकाशित केला आहे. स्क्रीन टाईम कन्सल्टंट एमिली चेर्किन यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. एमिली म्हणतात की, मुलांना स्मार्टफोन किंवा सोशल मीडियाचा वापर करण्यास तुम्ही जितका उशीर करू शकता तितके चांगले आहे.
मुलांना स्मार्टफोन देण्याचे धोके काय आहेत?
आणखी एका ना-नफा संस्थेच्या कॉमन सेन्स मीडियाच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 11 ते 15 वयोगटातील 1300 मुलींपैकी 60 टक्के मुलींना स्नॅपचॅटवर अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला होता आणि अस्वस्थ संदेश पाठवले होते. टिक टॉक वापरणाऱ्या 45 टक्के मुलींच्या बाबतीत असे घडले आहे. सोशल मीडिया हा लहान मुलांसाठी अनुकूल नसलेल्या सामग्रीने भरलेला आहे.
यामध्ये लैंगिक कंटेन्ट, हिंसेशी संबंधित कंटेन्ट, सेल्फ हार्म संबंधित कंटेन्ट समाविष्ट आहे. यासोबतच प्रत्येक प्लॅटफॉर्मवरील इनबॉक्समध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा भरणा आहे जे मुलांशी घृणास्पद बोलतात. या सर्वांचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
स्मार्टफोनला पर्याय काय?
गरज असेल तेव्हा तुमचा फोन मुलांना द्या, जेणेकरून ते त्यांच्या मित्रांशी बोलू शकतील किंवा त्यांना संदेश देऊ शकतील. त्यांना स्मार्टफोन देण्याऐवजी असा फोन द्या म्हणजे फक्त कॉल आणि एसएमएस करता येतील. स्मार्टफोनसारखे दिसणारे डंब फोनही बाजारात आहेत, पण त्यांच्याकडे फक्त बेसिक फोनची सेवा आहे.
स्मार्टफोन, सोशल मीडिया किंवा व्हिडिओ गेम्स मुलांना चुंबकाप्रमाणे आपल्याकडे खेचतात. एकदा का ते मुलांच्या हातात गेले की त्यांना त्यातून दूर करणे अशक्य होऊ शकते. मुलांचा मेंदू पुरेसा विकसित झालेला नसतो की ते त्या चुंबकीय पुलापासून स्वतःचे संरक्षण करू शकतील. म्हणूनच मुलांना स्मार्टफोन देण्यात जितका उशीर करता येईल तितका विलंब करा आणि जर ते द्यायचेच असेल तर पेरेंटल कंट्रोलने द्या.