अहमदनगर

‘येथे’ नागरिकांची घरे नाही सुरक्षित; सहा महिन्यात फोडली ऐवढी घरे

अहमदनगर- गेल्या सहा महिन्यात शहरासह ग्रामीण भागामध्ये रात्रीच्यावेळी 289 घरफोड्या झाल्या असून त्यापैकी केवळ 38 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. हे प्रमाण फक्त 13 टक्के आहे. रात्री बरोबर दिवसाही घरे सुरक्षीत नसल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यात 71 ठिकाणी दिवसा घर फोडले आहेत. त्यातील 19 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. हे प्रमाण 27 टक्के आहे.

दरम्यान दिवसा व रात्रीच्यावेळी मिळून एकुण 360 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असताना पोलिसांनी फक्त 57 घरफोडीच्या घटना उघडकीस आणण्यात यश आले आहे. अद्यापही 303 घरफोड्यांचा तपास लागलेला नाही. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

चोरट्यांच्या टोळ्यांकडून दिवसा घरांची टेहाळणी केली जाते. रात्रीच्यावेळी नागरिक घरात असताना किंवा नसतानाही चोरट्यांकडून घर फोडले जातात. घरातील दागिणे व रोख रक्कमेसह ऐवज लंपास केला जातो. वस्तीवर असलेल्या घरे दिवसा फोडले जातात.

 

शहरी भागातील नागरिक आपले घर बंद करून बाहेरगावी गेलेले असल्यास त्यांची घरे दिवसा देखील फोडली जातात.

दरम्यान घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलीस यंत्रणा त्या रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्यावेळी पोलिसांकडून गस्त घातली जात असली तरी गस्ती पथकाला चकवा देवून चोरटे घरफोडी करतात. त्यांच्याकडून धारदार शस्त्रांचा वापर केला जातो. सीसीटीव्हीमध्ये घरफोडीची घटना कैद झाल्यास तपास करण्यात त्याचा उपयोग होतो. परंतू अलिकडच्या काळात चोरट्यांकडून सीसीटीव्ही फोडून घरफोडीचा कार्यक्रम केला जात आहे. यामुळे पोलिसांसमोर अशा घटना उघडकीस आणण्यात अपयश येत आहे.

 

शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत जबरी चोरी केल्याच्या 136 घटना गेल्या सहा महिन्यात घडल्या आहेत. यामध्ये नगर शहर आणि परिसरातील जास्त घटनांचा समावेश आहे. त्यापैकी 89 गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची भूमीका महत्वाची राहिली आहे.

 

महिलांच्या गळ्यातील दागिणे धूमस्टाईने चोरीला जात आहेत. सहा महिन्यात अशा 53 घटना घडल्या असून त्यापैकी 30 घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुद्देमाल जप्त केला आहे. महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरीला जाण्याच्या घटना नगर शहरातील सावेडी उपनगरात जास्त प्रमाणात घडत आहेत. सण-उत्सव काळात खरेदीसाठी बाहेर पडणार्‍या एकटी महिला पाहून दागिणे चोरले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button