ताज्या बातम्या

Citroen VS Maruti : Citroen C3 की Baleno? तुमच्यासाठी कोणती कार आहे सर्वोत्तम? जाणून घ्या दोन्हीतील फरक

Aircross मध्ये 6 एअरबॅग आहेत. दुसरीकडे, बलेनोमध्ये मोठी 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. दोन्ही कारमध्ये अनके नवनवीन फरक आहेत.

Advertisement

Citroen VS Maruti : भारतीय बाजारात अनेक नवनवीन कार लॉन्च होत आहेत. यातीलच एक म्हणजे Citroen C3 Aircross व Maruti Baleno या दोन कार आहेत. या दोन्ही कार लोकांना खूप पसंत पडत आहेत.

अशा वेळी Citroen लवकरच Aircross लॉन्च करणार आहे. अलीकडेच कंपनीने आपल्या शक्तिशाली कारचे अनावरण केले आहे. त्याच वेळी, बलेनो ही मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी हॅचबॅक कार आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला या दोन्ही कारचे फीचर्स, किंमत आणि मायलेजबद्दल सांगणार आहे.

Maruti Baleno

Advertisement

कारमध्ये 5 स्पीड ट्रान्समिशन आहे

मारुती बलेनोची एक्स-शोरूम किंमत 6.61 लाख रुपये आहे. ही कार CNG मध्ये 30.61km/kg इतका मायलेज देते. कारमध्ये 5 स्पीड ट्रान्समिशन आहे. कारमध्ये 318 लीटरची मोठी बूट स्पेस आहे. सुरक्षिततेसाठी, कारला 6 एअरबॅग, ESP मिळतात. 2022 मध्ये मारुती बलेनोच्या एकूण दोन लाख युनिट्सची विक्री झाली आहे.

कार चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे

Advertisement

कारमध्ये मोठी 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. कारच्या CNG आवृत्तीमध्ये 55-लीटरची इंधन टाकी आहे. तसेच कारमध्ये 1197 cc चे इंजिन आहे. हे इंजिन 76.43 ते 88.5 Bhp हाय पॉवर जनरेट करते.

यात हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा आहे. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. कारचे पेट्रोल व्हर्जन 22.35 ते 22.94 kmpl मायलेज देते. त्याचे चार ट्रिम बाजारात उपलब्ध आहेत.

Citroen C3 Aircross

Advertisement

कारच्या 7-सीटर व्हेरिएंटला 511-लिटरची मोठी बूट स्पेस मिळेल.

अलीकडे, सिट्रोएन सी3 एअरक्रॉसवरून अनेक खुलासे झाले आहेत. ही कार 2023 च्या अखेरीस बाजारात उपलब्ध होईल. यात 1.2L टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल जे 110bhp पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करेल.

त्याची लांबी सुमारे 4.3 मीटर आहे आणि त्याची ग्राउंड क्लीयरन्स 200 मिमी आहे. यात 6-स्पीड गिअरबॉक्स मिळेल. ही एक उत्तम 5 सीटर कार आहे. कारमध्ये 444-लिटरची मोठी बूट स्पेस आहे. कारच्या 7-सीटर व्हेरिएंटला 511-लिटरची मोठी बूट स्पेस मिळेल.

Advertisement

6 एअरबॅग आणि स्टेबिलिटी कंट्रोल सिस्टम

सुरक्षिततेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, स्टेबिलिटी कंट्रोल सिस्टम, पार्किंग सेन्सर्ससह रियर व्ह्यू कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि EBD सह ABS मिळू शकते. ही CMP मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित कार आहे.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button