Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : शहर बँक अपहार प्रकरण : सी.ए. विजय मर्दास जामीन...

Ahmednagar News : शहर बँक अपहार प्रकरण : सी.ए. विजय मर्दास जामीन मंजूर

Ahmednagar News : अर्बन बँक अपहरण प्रकरणातील आरोपी विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना नुकताच तीनही प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला.

अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. १ एम.ए. बरालिया यांचे न्यायालयाने जामीन मंजूर केला. अॅड. सतिश गुगळे यांनी मर्दा यांचे वतीने सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर केलेला होता.

आरोपी विजय मर्दा यांचा सहभाग हा केवळ अनुमानावरुन काढलेला आहे व त्यास प्रथमदर्शनी समर्पक असा पुरावा दिसून येत नसून अपहाराची कोणतीही रक्कम हस्तेपर हस्ते आरोपी विजय मर्दा यांना आल्याचे आढळून येत नसल्याचे म्हटले आहे.

दाखल गुन्ह्यामध्ये जी कलमे लावण्यात आली आहेत ती विजय मर्दा यांना लागू होत नसल्याचे म्हटले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व कायदेशीर बाजू,

उपलब्ध पुरावा व सादर करण्यात आलेला युक्तीवाद या सर्वांचे अवलोकन करून मर्दा यास तिनही प्रकरणात जामीन मंजूर केला असल्याची माहिती मिळाली आहे.

सन २०१८ मध्ये डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्वला कवडे, डॉ. विनोद श्रीखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.

एम्स हॉस्पीटल उभारण्याच्या प्रोजेक्टमध्ये वरील तीनही व्यक्तींच्या नावे बनावट कर्ज प्रकरणे करुन त्यांचे बनावट कागदपत्रे, बनावट सह्या करुन कर्ज प्रकरण मंजूर केले.

त्यानंतर बँक अधिकारी व संचालक यांचेशी संगनमत करुन आरोपी डॉ. निलेश शेळके यांनी प्रत्येकी रु. ५ कोटी ७५ लाख असे एकूण रु. १६ कोटी पेक्षा जास्त रकमेचा अपहार केला अशा पद्धतीच्या तीन स्वतंत्र्य तक्रारी आलेल्या होत्या.

१३ डिसेंबर २०२३ रोजी विजय मर्दा यांना अटक झाली होती. तीनही स्वतंत्र प्रकरणामध्ये ते कारागृहामध्ये होते. अॅड. सतिश गुगळे यांनी मर्दा यांचे कार्य हे कायदेशीर सल्लागार व सी.ए. या कार्यकक्षेत केलेले असल्याने त्यास प्रथमदर्शनी फसवणूक अपहार किंवा बनावट दस्त तयार करण्याचे व्याख्येमध्ये घेता येणार नाही असा युक्तीवाद केला होता.

सरकारपक्षाद्वारे त्यांची शहर बँकेसह नगर अर्बन बँकेच्या झालेल्या अपहारात सहभाग असल्याचा युक्तीवाद केलेला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments