अहमदनगर

नगर शहर सहकारी बॅक फसवणूक प्रकरण; सहा किलो बनावट सोन्यावर दिले ‘ऐवढ्या’ कोटींचे कर्ज

अहमदनगर- अहमदनगर शहर सहकारी बँकेचे व्यवस्थापक दिनेश सुधाकर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात बनावट सोने तारण प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता या बनावट सोनेतारण फसवणूक प्रकरणात रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. कोतवाली पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून आज (मंगळवारी) काही खुलासा केला आहे.

 

बनावट सोन्यावर हॉलमार्कचा शिक्का मारून तब्बल पाच हजार 926 ग्रॅम (592 तोळे) वजनाचे बनावट सोने तारण ठेवत दोन कोटी 20 लाख 13 हजारांचे कर्ज घेण्यात आले. बँकेमध्ये या बनावट सोन्याची व्हॅल्युएशनची रक्कम दोन कोटी 70 लाख 36 हजार 840 दर्शवण्यात आली आहे. यामध्ये आता 23 आरोपी झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासात संत नागेबाबा पतसंस्था व महात्मा फुले पतसंस्थेच्या सोनेतारण कर्जाच्या पावत्या जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

सुरूवातीला अजय किशोर कपाले (गोल्ड व्हॅल्युअर), विशाल संजय चिपाडे, ज्ञानेश्वर रतन कुताळ, सुनील ज्ञानेश्वर आळकुटे, संदीप सिताराम कदम, श्रीतेश रमेश पानपाटील यांना अटक करण्यात आली आहे.

 

आता उस्मान अजिज तांबोळी, साजीद अजित तांबोळी, जेन्नुदीन पापामिया पठाण, अभिषेक पांडुरंग चौगुले, राहुल सुधाकर शिंदे, यासिन नासर आरब, वसीम निसार शेख, अनिल मल्लेश दिकोंडा, दीपक विरबहाददुर राजपुत, महेश प्रदीप पालवे, मयुर सुरेश बुळे, सतीश रामदा पडोळे, कालीदास सोन्याबापु कोकरे, विराज सुनील ढोरे, संदीप सिताराम कदम, चेतन चोरडीया, अल्का चोरडीया यांच्या नावावर बनावट सोनेतारण कर्ज करण्यात आल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.

 

आरोपींच्या घरझतीमध्ये शहर सहकारी बँकेसह, संत नागेबाबा पतसंस्था (केडगाव शाखा), महात्मा फुले पतसंस्था (आलमगीर, भिंगार) यांच्या सोनेतारण कर्ज पावत्या आढळून आल्या आहेत. इतरही काही बँकांमध्ये किंवा पतसंस्थांमध्ये असे गैरप्रकार घडल्याची शक्यता आहे त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

 

सदरची कारवाई निरीक्षक शिंदे यांच्या आदेशाने उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार अभय कदम, बापुसाहेब गोरे, गणेश ढोबळे, दीपक बोरूडे, सलिम शेख, बंडू भागवत, सुमित गवळी, अतुल काजळे यांनी केली आहे.

 

दरम्यान आरोपींकडून बनावट दागिन्यांवर हॉलमार्कचे शिक्के मारणारी मशीन जप्त करण्यात आली आहे. त्याचा तपास सुरू आहे. मात्र, इतरही काही पतसंस्था, बँकांमध्ये असे प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर बँका व पतसंस्थांनी त्यांच्याकडे असलेली सोनेतारण कर्जाची खाती व त्यातील सोने तपासावे. त्यात काही गैरप्रकार आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आव्हान निरीक्षक शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button