नगर शहरवासियांना कोरोनाचे गांभीर्य नाही? तीन दिवसात…..

सुरुवातीस मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होते आता हळूहळू वाढत आहेत. करोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा धोका अधिक गडद होत असताना
अहमदनगरकरांनी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश धाब्यावर बसवल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. शहरात रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
गेल्या तीन दिवसांत 53 रूग्णांना करोना (Positive Patient) संसर्गाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नगरकरांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यता जाणवत आहे.
नाहीतर कोरोनाच्या बाबतीत नगर शहराची अवस्था मुंबई सारखी होऊ शकते. त्यात 2 जानेवारीला 31, 3 जानेवारीला 14 आणि काल 4 जानेवारीला 8 करोना बाधीत समोर आले आहे.
सध्या लग्नसमारंभ दणक्यात सुरू असून इतर कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. याशिवाय बाजारपेठा आणि रात्रीच्यावेळी चौका-चौकात गर्दी होताना दिसत आहे.
रात्री नऊ नंतर जमावबंदी आदेश लागू असला तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही व तो जमावबंदीचा आदेश कोणी गांभीर्यानी घेत नाही असे दिसून येत आहे.ही नागशहरातील वास्तविकता आहे असे अनेक जाणकार सांगतात.
रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये गर्दी असते. यातून रूग्णसंख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. महापालिका, पोलीस प्रशासनाने जमावबंदीचा आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. जमावबंदीचा आदेश जनतेच्या हिताचा आहे हे जनतेनी लक्ष्यात घ्यावे.