Saturday, February 24, 2024
Homeब्रेकिंग'सिटी किलर' लघुग्रह पृथ्वीजवळ !

‘सिटी किलर’ लघुग्रह पृथ्वीजवळ !

Marathi News : संभाव्य धोकादायक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असून तो गेल्या शंभर वर्षांत पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार आहे.

तो पुन्हा पृथ्वीजवळ येण्यासाठी अनेक शतके लागण्याची शक्यता नासाच्या अंतराळ संशोधकांनी व्यक्त केली आहे.

नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) नुसार २००८ ओएस ७ नावाचा महाकाय लघुग्रह सुमारे ८९० फूट (२७१ मीटर) रुंद असून तो सुमारे पृथ्वीच्या १.७७ दशलक्ष मैल म्हणजेच २.८५ दशलक्ष किलोमीटर अंतरावरून जाणार आहे.

हे अंतर पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्रापेक्षा सात पट जास्त असल्याचेही नासाच्या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

व्हर्चुअल टेलिस्कोप पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या या लघुग्रहाचे थेट प्रक्षेपण करणार असल्याने या टेलिस्कोपच्या मदतीने लघुग्रह सहजपणे पाहता येणार आहे.

जेपीएलच्या म्हणण्यानुसार, हा लघुग्रह पृथ्वीजवळून ताशी ४१ हजार मैल म्हणजेच ताशी ६६ हजार किमी वेगाने जाणार असून त्याचा आकार जवळपास बेन्नूच्या अंदाजे अर्धा आकाराचा आहे.

नासाने या अंतराळ खडकाचे नमुनेही गोळा केले असून, त्यांचे विश्लेषण केले जात आहे. जेपीएलच्या अंदाजानुसार २००८ ओएस ७ चे आकारमान आणि पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे संभाव्य धोकादायक म्हणून वर्गीकृत करण्यात आला असला तरी त्याचा पृथ्वीवर परिणाम होण्याची शक्यता नसून तो पृथ्वीला धोका पोहोचवू शकेल एवढा जवळ कधीही येणार नसल्याचा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

आणि अनपेक्षितरीत्या हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तरी त्याच्यापासून संपूर्ण पृथ्वीला धोका पोहोचण्याची शक्यताही कमीच आहे. मात्र त्याच्या आघातामुळे न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहराचा विध्वंस करू शकेल, अशी भीतीही संशोधकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नासाने सुमारे २५ हजार संभाव्य धोकादायक लघुग्रहांची ओळख पटवली असून त्यापैकी केवळ एकच लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. या प्राणघातक लघुग्रहांपैकी एक लघुग्रह दर २० हजार वर्षांनी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments