दारूचे दुकान टाकण्यावरून दोन तरुणांमध्ये हाणामारी ! पोलिस ठाण्यापर्यंत प्रकरण गेले खरे….. पण
अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद शाळेच्या आवाराबाहेरच सर्रासपणे दारू विक्री होत असताना प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

Ahmednagar News : बेलापूर उक्कलगाव येथे दारूचे दुकान टाकण्यावरून दोन तरुणांमध्ये रविवारी सकाळी हाणामारी झाल्याची घटना घडली.
अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद शाळेच्या आवाराबाहेरच सर्रासपणे दारू विक्री होत असताना प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
गावात परमिट बारसारखे दारूचे धंदे खुलेआम सुरू आहेत. सद्य:स्थितीला उक्कलगाव ग्रामपंचायतीचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर लगेच निवडणूक आयोगाने या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू केली आहे.
अवैधरीत्या दारू विक्रीला ग्रामस्थ वैतागले आहेत. दररोज कोणत्याही कारणाने गावात वादंग निर्माण होऊन वातावरण तंग होते. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवाराबोहरील भाग व शाळेच्या पाठीमागील बाजूला दारू विक्री केली जाते. हा अड्डा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
दुसऱ्या एका तरुणाने येथे दारू विकण्यास स्पष्ट विरोधी भूमिका घेतली. ‘त्या’ अवैध दारू विक्री करण्याच्या व्यक्तीने वीट मारण्यापर्यंत तरुणावर धावून आले. अशाने या विक्रेत्याची हिमंत वाढली. त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने संशय व्यक्त करण्यात आला.
अवैध दारू धंदे बंद करावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र, धंदे बंद झाले नाहीत, विशेष म्हणजे अवैध दारू विक्रेता दररोज बेलापूर पोलिस चौकीला जेवणाचे डबे पुरवितो. त्यांचे पोलिसांशी लागेबांधे असल्याने तर कारवाई होत नसावी ना? असा सवाल उपस्थित झाला आहे.